‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत ‘लोकसत्ता लोकांकिका’चा नाटय़जागर आता खऱ्या अर्थाने सुरू झाला आहे. राज्यभरातील महाविद्यालयांमधून ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेसाठी कसून तयारी करणाऱ्या कलावंतांना याच व्यासपीठावरून आणखी एक सुवर्णसंधी मिळणार आहे. ‘लोकांकिका’ स्पर्धेतील गुणवान कलावंतांना हेरण्याचे काम नाटय़-मालिका आणि चित्रपटनिर्मिती क्षेत्रातील आघाडीची संस्था ‘आयरिस प्रॉडक्शन’ करणार आहे. या गुणवंतांना थेट आयरिस प्रॉडक्शनबरोबर काम करण्याची संधी मिळणार आहे.
‘आयरिस प्रॉडक्शन’ हे ‘लोकसत्ता लोकांकिका’चे टॅलेंट सर्च पार्टनर आहेत. ‘लोकांकिका’ स्पर्धेतर्गत विविध केंद्रांवरील प्राथमिक फे रीत सादर होणाऱ्या एकांकिकांमधील निवडक कलाकारांना ‘आयरिस प्रॉडक्शन’बरोबर काम करण्याची संधी मिळणार आहे. ‘आयरिस प्रॉडक्शन’च्या वतीने नामवंत कलाकार-दिग्दर्शक विविध केंद्रांवर उपस्थित राहणार आहेत. दिग्दर्शिका, लेखिका प्रतिमा कु लकर्णी, अभिनेता आणि डबिंग आर्टिस्ट श्रीरंग देशमुख, चित्रपट दिग्दर्शक केदार वैद्य, ‘आयरिस प्रॉडक्शन’चे विद्याधर पाठारे, लेखक-दिग्दर्शक वैभव चिंचाळकर, ‘आयरिस’चे क्रिएटिव्ह हेड मनीष दळवी, अभिनेता अजिंक्य जोशी, पटकथा लेखक अभिजीत गुरू आणि अभिनेत्री समिधा गुरू, दिग्दर्शिका सुवर्णा मंत्री आणि कार्तिक केंदे, अभिनेता लोके श गुप्ते, दिग्दर्शक सचिन गद्रे आदी मान्यवर प्राथमिक फे रीदरम्यान ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या विविध कें द्रांना भेट देऊन तेथील गुणवंतांना हेरणार आहेत. या मान्यवरांनी निवड केलेल्या गुणवान कलाकारांना आयरिसची निर्मिती असलेल्या मालिका आणि नाटकांमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी मिळेल.
अस्तित्त्व संस्थेच्या सहकार्याने होणाऱ्या सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत लोकसत्ता लोकांकिका या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रायोजकत्व झी मराठी वाहिनीकडे आहे. या वाहिनीवरील रविवारच्या नाटय़विषयक ‘नक्षत्र’ या कार्यक्रमात ‘लोकसत्ता लोकांकिका’ची महाअंतिम फेरी पाहता येईल.
अर्जस्वीकृती मंगळवापर्यंतच
अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख मंगळवार, २५ नोव्हेंबर आहे. या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. त्यामुळे आपल्या महाविद्यालयाची एकांकिका महाराष्ट्राची ‘लोकांकिका’ व्हावी, अशी इच्छा असणाऱ्यांनी २५ नोव्हेंबपर्यंत अर्ज पूर्ण भरून दाखल करावेत. स्पर्धेचा प्रवेश अर्ज, नियम आणि अटी लोकसत्ताच्या indianexpress-loksatta.go-vip.net /lokankika या संकेतस्थळावर मिळतील.