९ एप्रिलपर्यंत खरेदीसोबत बक्षिसे लुटण्याची संधी

गेले पाच दिवस सुरू असलेल्या ‘लोकसत्ता मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’च्या तिसऱ्या पर्वाला यंदाही भरघोस प्रतिसाद मिळतो आहे. २४ मार्चपासून सुरू झालेल्या या फेस्टिव्हलमध्ये खरेदीबरोबरच बक्षिसाचा दुहेरी आनंदही लुटता येणार आहे.

यात बृहन्मुंबई परिसरातील अनेक गृहोपयोगी वस्तूंच्या शोरूम्सनी सहभाग घेतला आहे. ‘लोकसत्ता मुंबई शॉिपग फेस्टिव्हलमध्ये’ सहभागी होणाऱ्या ग्राहकांना दररोज सुवर्णमुद्रा, चांदीचे नाणे, एलईडी टीव्ही, फ्रिज, गिफ्ट कूपन अशी आकर्षक पारितोषिके जिंकता येणार आहेत. महोत्सवाच्या अखेरीस सोडतीद्वारे पहिल्या भाग्यवान ग्राहकाला कार व दुसऱ्या विजेत्याला ‘केसरी टुर्स’कडून सहलीचे पॅकेज यांसारखी पारितोषिके दिली जाणार आहेत. ९ एप्रिलपर्यंत महोत्सव सुरू राहणार आहे.

‘रिजेन्सी समूह’ प्रस्तुत ‘लोकसत्ता मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’साठी ‘पितांबरी’ सहप्रयोजक आहेत. ट्रॅव्हल पार्टनर ‘केसरी टूर्स’, बँकिंग पार्टनर ‘युनियन बँक’, पॉवर्ड बाय ‘तन्वीशता’ आणि ‘वास्तु रविराज’ तर ‘एम. के. घारे ज्वेलर्स’ आणि ‘श्री नेमिनाथ ज्वेलर्स’ हे फेस्टिव्हलचे गोल्ड पार्टनर तसेच ‘सावंत ज्वेलर्स’ आणि ‘सौभाग्य ज्वेलर्स’ हे सिल्व्हर पार्टनर आहेत. तर हेल्थ पार्टनर म्हणून ‘ब्रह्मविद्या साधक संघ’ याशिवाय, ‘अपना बाजार’, ‘राणेज पैठणी’, ‘देसाई बंधू आंबेवाले’, ‘मिलन लाइफस्टाइल्स’, ‘पर्शिया दरबार’ आणि ‘अजय अरविंदभाई खत्री’ हे या फेस्टिव्हलचे गिफ्ट पार्टनर आहेत. सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी माहितीसाठी संपर्क : नमिता खांडभोर – ८१०८३८८१२२ आणि ऋतिका मोरे – ९५९४२२२०६९ या क्रमांकावर संपर्क साधावा.

कसे सहभागी व्हाल?

  • लोकसत्ता मुंबई शॉिपग महोत्सवात सहभागी असलेल्या दुकानात खरेदी करणाऱ्या ग्राहकांनाच या बक्षिसांची संधी मिळू शकेल.
  • सहभागी दुकानांमध्ये २५० रुपयांपेक्षा अधिक खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बिल दिल्यानंतर दुकानदारांकडून त्यांना एक कूपन दिले जाईल.
  • ते कूपन भरून दुकानात असलेल्या ‘लोकसत्ता’च्या ड्रॉप बॉक्समध्ये टाकायचे आहे.
  • अर्धवट माहिती भरलेली कूपन फेटाळले जातील.
  • ड्रॉपबॉक्स’मध्ये दररोज जमा होणाऱ्या कूपन्समधून दररोज एका भाग्यवान विजेत्याची निवड केली जाईल व त्याचे नाव ‘लोकसत्ता मुंबई’ मधून प्रसिद्ध केले जाईल.

*अटी-शर्ती लागू आहेत.