‘राम बंधू चिवडा मसाला’ प्रस्तुत ‘लोकसत्ता ९९९- नवभक्ती, नवरंग, नवरात्री’ या स्पर्धेचा दुसरा व तिसरा दिवस अनुक्रमे मुलुंड व भायखळ्यात पार पडला. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. उपस्थित महिलावर्ग मोठय़ा संख्येने मंगळागौरीच्या खेळात सहभागी झाले होते. या वेळी पारितोषिकांची लयलूट असल्याने महिलावर्गाचा आनंद द्विगुणित झाला होता. या कार्यक्रमात लोकनृत्याचे सादरीकरण करण्यात आले. त्यामुळे उपस्थितांसाठी यंदाची नवरात्र पारंपरिकतेने सजलेली होती. या प्रसंगी विविध स्पर्धाचेही आयोजन करण्यात आले होते. प्रेक्षकांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी अभिनेत्री मधुरा वेलणकर आवर्जून उपस्थित होती.

राम बंधू चिवडा मसाला प्रस्तुत ‘लोकसत्ता ९९९- नवभक्ती, नवरंग, नवरात्री’चा दुसरा दिवस मुलुंड येथील जय अंबे नवरात्रोत्सव सार्वजनिक मंडळात पार पडला. दिवाळीच्या तिखट फराळ्यांच्या दिवाळी स्पर्धेचे परीक्षण मधुरा वेलणकर यांनी केले आणि विजेत्या महिलांना बक्षिसे दिली. याप्रसंगी ‘राम बंधू मसाल्या’चे अरुण राणे व श्रीकांत तिवारी उपस्थित होते.

नवरात्रोत्सवाचा तिसरा दिवस भायखळा येथील सार्वजनिक उत्सव मंडळ, बकरी अड्डा येथे पार पडला. याप्रसंगी ‘राम बंधू मसाल्या’चे अमित शहा, संतोष गुजर उपस्थित होते. याशिवाय ‘ड्राय डे’ या चित्रपटातील ऋत्विक केंद्रे, मोनालिसा बागल, योगेश सोहोनी, कैलास वाघमारे, पार्थ घाटगे, चिन्मय काबंळी आदी कलाकारही उपस्थित होते.

प्रायोजक

राम बंधू चिवडा मसाला प्रस्तुत लोकसत्ता ९९९- नवभक्ती, नवरंग, नवरात्री या कार्यक्रमाचे सहप्रायोजक केसरी टूर्स असून बँकिंग पार्टनर जनकल्याण सहकारी बँक लि. आणि पॉवर्ड बाय एम. के. घारे ज्वेलर्स आहेत.

आजचा कार्यक्रम

अशोक पाटील मित्र मंडळ, आंबेडकर भवन, सेक्टर १५, ऐरोली, नवी मुंबई येथे सायंकाळी ६ ते ९ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.