आपले वय आणि व्यवसाय यांच्याशी आपला आहार निगडित असावा काय? कामातील वैविध्यानुसार कोणता आहार घ्यावा? लहान मुलांपासून वृद्धांपर्यंतच्या व्यक्तींची पचनशक्ती आणि रुची यांचा विचार करून कशाप्रकारचा आहार असावा?..
आपल्या लाखमोलाच्या आरोग्याशी निगडित असे विविध प्रश्न आणि शंका आपल्या मनात असतात. त्यांची उत्तरे मिळण्याची संधी लाभणार आहे ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’च्या प्रकाशननिमित्ताने आयोजित कार्यक्रमात. तेही थेट ख्यातकीर्त वैद्य प. य. खडीवाले यांच्याकडून.
वय आणि व्यवसाय यानुसार खाण्याच्या गरजा बदलत जातात तसेच पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या कामातल्या वैविध्यतेमुळे खाण्यातल्या पौष्टिकतेचा वेगळा विचार करणे गरजेचे असते. हेच लक्षात घेऊन  वैद्य प. य. खडीवाले यांनी सिद्ध केलेल्या ‘पूर्णब्रह्म’या पाककृती संग्रहाच्या प्रकाशननिमित्ताने खास ठाणे, नवी मुंबई आणि पनवेल परिसरातील नागरिकांसाठी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे शुक्रवार, ३ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकांमधील आहार साक्षरता वाढविण्याच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या या संमारभास स्वत: वैद्य खडीवाले उपस्थित राहणार आहेत. प्रेक्षकांना त्यांच्याशी थेट संवाद साधून खाद्यविषयक शंकांचे निरसन करण्याची संधी मिळणार आहे. हा कार्यक्रम सर्वासाठी खुला असून प्रथम येणाऱ्यांस प्राधान्य दिले जाईल.
‘पूर्णब्रह्म’ची वैशिष्टय़े
*चारशेपेक्षा जास्त पाककृती
*विद्यार्थी, युवक, स्त्री, श्रमिक, नोकरदार, वृद्ध आणि खेळाडू असे सात विभाग
*वय आणि व्यवसायाच्या गरजेनुसार आवश्यक पाककृतींचा समावेश
*रोजच्या जेवणासाठीच्या पदार्थाबरोबरच नाश्त्यासाठी करता येतील अशा पौष्टिक पाककृतींचाही समावेश
*पारंपरिक तसेच आत्ताच्या पिढीच्या आवडीच्या खाद्यपदार्थाचाही अंतर्भाव
किंमत ५० रु. पाककृती संग्रह सर्वत्र उपलब्ध.