सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपल्यासमोर आरोग्य संदर्भात अनेक समस्या निर्माण होतात. या समस्यांचा ऊहापोह करण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी ‘लोकसत्ता’च्या वतीने ‘आरोग्यमान भव’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आरोग्य संदर्भातील प्रश्न, जीवनशैली, आहार, मानसिक आरोग्य या संदर्भात खास परिसंवाद आणि आरोग्य प्रदर्शनाचे आयोजन या कार्यक्रमात करण्यात आले असून तज्ज्ञ डॉक्टर मार्गदर्शन करणार आहेत.
२० आणि २१ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता ठाण्यातील टिप टॉप प्लाझा येथे ‘आरोग्यमान भव’चे आयोजन करण्यात आले आहे. विख्यात शल्यचिकित्सक व लेखक डॉ. रवी बापट ‘सर्वसाधारण आरोग्य’ या विषयावर सकाळी १० वाजता उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत, तर सकाळी ११.१५ वाजता दुसऱ्या सत्रात प्रसिद्ध आहारतज्ज्ञ वैद्य सुचित्रा कुलकर्णी या ‘आहार आणि आरोग्य’ या विषयावर विचार मांडतील. केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. शुभांगी पारकर १२.१५ वाजता ‘मनाचे आरोग्य’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. शनिवारी आणि रविवारी याच वेळेला आणि याच विषयांवर वेगवेगळय़ा श्रोत्यांसमोर या परिसंवादांचे आयोजन करण्यात आले आहे. श्रोत्यांच्या प्रश्नांनाही डॉक्टर उत्तरे देणार आहेत.
प्रवेशिका कुठे मिळणार?
या कार्यक्रमासाठी ३० रुपये प्रवेश शुल्क असून प्रवेशिका १६ सप्टेंबरपासून लोकसत्ता, कुसुमांजली, दुसरा मजला, गोखले रोड, कॉसमॉस बँकेच्या वर, नौपाडा, ठाणे (पश्चिम) येथे आणि टिप टॉप प्लाझा, एल. बी. एस. मार्ग, ठाणे (पश्चिम) येथे सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत उपलब्ध असतील.
आरोग्यमान भव! (आरोग्य संदर्भातील विषयांवर परिसंवाद आणि प्रदर्शन)
२० आणि २१ सप्टेंबर, सकाळी १० वाजता.
टिप टॉप प्लाझा, एल. बी. एस. मार्ग, ठाणे (पश्चिम)