‘मराठी माणूस हा नाटकवेडा आहे’ असे म्हटले जात असले तरी गेल्या काही वर्षांत त्याचे नाटकावरचे प्रेम काहीसे ओसरले आहे की काय, अशी शंका यावी अशी परिस्थिती आहे. मराठी नाटकांचा प्रेक्षक दिवसेंदिवस रोडावतो आहे, अशी तक्रार नाटय़निर्मात्यांसह अनेक रंगकर्मी करत आहेत. याची कारणे अनेक असली आणि ती सर्वानाच माहीत असली तरीही मराठी नाटकांवर रुसलेल्या रसिकांना पुनश्च रंगभूमीकडे वळविण्यासाठी आता ‘लोकसत्ता’ पुढाकार घेणार आहे.
रंगभूमीवर येणाऱ्या नव्या, उत्तम नाटकांना तालमीपासून प्रत्यक्ष प्रयोगापर्यंत आणि त्यानंतर ते रसिकांपर्यंत पोहोचविण्याच्या प्रक्रियेत ‘लोकसत्ता’ नाटय़निर्मात्यांना सर्वतोपरी साहाय्य करणार आहे. चांगल्या नाटकांना प्रोत्साहन मिळावे हा हेतू तर यामागे आहेच; त्याचबरोबर रसिकांनाही कोणती उत्तम नाटय़कृती रंगभूमीवर येते आहे, तिची वैशिष्टय़े कोणती, हे कळावे आणि त्यांनी या नाटकांचे भरभरून स्वागत करावे, हा मुख्य उद्देश ‘लोकसत्ता संपादक शिफारस’ या नव्या उपक्रमामागे आहे.
याआधी लोकांमध्ये वाचनसंस्कृती वाढीस लागून उत्तम मराठी पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचावीत आणि ग्रंथ प्रकाशन व्यवसायाला साहाय्य व्हावे यासाठी ‘लोकसत्ता’तर्फे ‘लोकसत्ता संपादक शिफारस’ हा उपक्रम घोषित करण्यात आला होता. त्याचे प्रकाशन व्यवसायाकडून सहर्ष स्वागत झाले. त्याच धर्तीवर नवी, उत्तम मराठी नाटके रसिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी योजलेल्या ‘लोकसत्ता संपादक शिफारस’ या उपक्रमाचेही समस्त नाटय़निर्मात्यांनी स्वागत केले आहे.
या योजनेसंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीला व्यावसायिक नाटय़निर्माता संघाचे अध्यक्ष आणि अभिनेते प्रशांत दामले, नव्याने नाटय़निर्मितीत उतरलेल्या अभिनेत्री मुक्ता बर्वे, ‘सुयोग’चे गोपाळ अलगेरी, ‘श्रीचिंतामणी’ संस्थेच्या लता नार्वेकर, ‘अष्टविनायक’चे दिलीप जाधव, ‘नाटय़संपदा’चे अनंत पणशीकर, ‘भद्रकाली’चे प्रसाद कांबळी, ‘महाराष्ट्र रंगभूमी’चे संतोष कोचरेकर यांच्यासह चंद्रकांत लोहकरे, अजित भुरे, श्रीपाद पद्माकर, मंगेश कांबळी, गोटय़ा सावंत, अमित सुर्वे आदी मंडळी उपस्थित होती. याखेरीज काही अपरिहार्य कारणांस्तव या बैठकीस हजर राहू न शकलेल्या उदय धुरत, भरत जाधव, राहुल भंडारे, राकेश सारंग आदी निर्मात्यांनीही ‘लोकसत्ता’चा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगून ही कल्पना उचलून धरली आहे. ‘लोकसत्ता संपादक शिफारस’ या उपक्रमाचे अवघ्या नाटय़सृष्टीनेच मन:पूर्वक स्वागत केले असून, या उपक्रमामुळे सध्या मरगळलेल्या अवस्थेतील मराठी रंगभूमीला पुनश्च चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा या निर्मात्यांनी व्यक्त केली आहे.
मराठी नाटय़व्यवहाराला मदतीचा हात देण्यासाठीही ‘लोकसत्ता’ सर्वतोपरी झटणार आहे.
त्यासाठी ‘लोकसत्ता संपादक शिफारस’ या उपक्रमाखेरीज नाटय़विषयक विविध उपक्रमांच्या बातम्या, नाटकांची पूर्वप्रसिद्धी, नाटकाशी संबंधित रंगकर्मीशी बातचीत, नाटकावरील खुली चर्चा, परिसंवाद तसेच नाटय़कर्मीच्या मुलाखती, नाटय़परीक्षण अशा विविध मार्गानी मराठी नाटक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे; जेणेकरून त्याचा नाटय़व्यवसायास फायदा व्हावा, याकरता जातीने प्रयत्न करण्यात येणार आहेत. ‘लोकसत्ता संपादक शिफारस’ या उपक्रमाबद्दलचा तपशील सर्व संबंधितांशी चर्चा आणि विचारविनिमय करून निश्चित करण्यात येत असून, या उपक्रमांतर्गत निवड झालेल्या नाटकाची घोषणा लवकरच केली जाणार आहे.     
    
तालमीपासून प्रयोगापर्यंत..
*लोकसत्ता संपादक शिफारस या उपक्रमाद्वारे उत्तम नाटकांची तालमीपासून प्रयोगापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर प्रसिद्धी.
*नाटय़विषयक विविध उपक्रमांच्या बातम्या सातत्याने देणार.
*नाटकांची पूर्वप्रसिद्धी करणार.
*नाटकाशी संबंधित लेखक, दिग्दर्शक, कलावंतांशी बातचीत.
*नाटकावर खुली चर्चा, परिसंवाद तसेच संबंधितांच्या जाहीर मुलाखती.

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
election material making work increase due to parties splits
पक्षफुटींमुळे प्रचार साहित्याला ‘अच्छे दिन’; झेंडे, टोप्या, फेटे निर्मितीस सुरुवात, चिन्हे जास्त असल्याने कामात वाढ
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..