शिवसेना व भाजपमधील ‘मैत्री’ पूर्ण संबंध गेल्या तीन-चार आठवडय़ात रस्त्यावर आले असताना आणि भाजपच्या सर्वोच्च नेत्यांवर शिवसेनेच्या नेत्यांनी टीकास्त्र सोडल्यानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगले वातावरण निर्माण करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमवेत ‘मातोश्री’ निवासस्थानी सपत्नीक सहभोजन घेतले. राजकीय चर्चा झाली नाही, वन्य प्राणी व छायाचित्रण अशा बाबींवर चर्चा झाल्याचे उभयपक्षी सांगण्यात आले. मात्र सोमवारी सकाळी मुख्यमंत्री फडणवीस यांची तब्येत मात्र काहीशी बिघडली. दुपारी त्यांनी काही काळ विश्रांतीही घेतली. रशिया दौऱ्यावरुन आल्यावर लगेच पंढरपूर, अनेक बैठका व कार्यक्रम यामुळे मुख्यमंत्र्यांना दगदग झाली. रविवारी रात्रीचे ‘मातोश्री’वरील सहभोजन आणि मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडणे, हा केवळ निव्वळ योगायोगच की..?

‘मातोश्री’वरचे स्नेहभोजन आणि मुख्यमंत्र्यांची तब्येत

पुन्हा सत्ता आली तर ना !

डॉ. कुटे यांच्याप्रमाणेच मंत्रिपद न मिळालेल्या अन्य एक-दोन आमदारांनाही डिवचण्यात आले. काँग्रेसच्या एका आमदाराने भाजपच्या आमदाराला जाऊ दे, पुढच्या वेळी संधी मिळेल, असा धीर देण्याचा प्रयत्न केला. त्यावर पुढच्या वेळी सत्ता आली तर ना, असे प्रत्युत्तर त्या भाजपच्या आमदाराने दिले.  उ

मुंडे, मुंढे चर्चेत

पंकजा मुंडे यांच्या मदतीला पाच-पाच मंत्री धावून आल्याने विधिमंडळ परिसरात त्याची चर्चा होतीच. पण दुसऱ्या बाजूला मुंढे या नावही चर्चेत होते. नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामे पाडण्यावरून सत्ताधारी भाजपच्या आमदार मंदाताई म्हात्रे आणि पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यातील वाद चांगलाच चव्हाटय़ावर आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंढे यांच्या उधळलेल्या वारूला लगाम घातला आणि अनधिकृत बांधकामे पाडण्याची मोहीम सध्या तरी स्थगित करण्याचा आदेश दिला. यावरून मंदा म्हात्रे यांच्याकडे आमदारमंडळी विचारणी करीत होते. आपण आयुक्त मुंढे यांना कसे पुरून उरलो याचेच मंदाताईंना समाधान होते.