एक महल हो सपनों का.. प्रत्येकाने कधी ना कधी पाहिलेले घराचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ‘लोकसत्ता वास्तुरंग वास्तुलाभ’ने मदतीचा हात पुढे केला आहे. प्रत्येकाच्या आवश्यकतेप्रमाणे व परवडतील अशा हजारो घरांचे पर्याय उपलब्ध करून देतानाच नवीन घर जिंकण्याची संधीही या योजनेतून मिळणार आहे.
कष्टाने जमवलेल्या पैशांनी स्वप्नातील घर प्रत्यक्षात आणण्यासाठी अनेक महिने भ्रमंती करावी लागते, हा mu08अनुभव अनेकांना आलाच असेल. ग्राहकांच्या गरजांप्रमाणे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल परिसरात आटोपशीर घरांपासून आलिशान बंगल्यांपर्यंत सर्व प्रकारचे पर्याय उपलब्ध करून देणारी ‘लोकसत्ता वास्तुरंग वास्तुलाभ’ योजना मोफत घरांपासून इतर अनेकविध बक्षिसांची लयलूट करणार आहे. घर घेण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करत असलेल्यांना त्यांच्या पैशांचा पुरेपूर मोबदला मिळण्याची पुरेपूर शाश्वती देणाऱ्या या योजनेत अनेक प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिक सहभागी झाले आहेत.
विकत घेतलेल्या घरासोबत आणखी एक घर मोफत मिळवण्याच्या सोडतीत सहभागी होण्यासाठी अगदी सहज-सोपा मार्ग आहे. या योजनेत सहभागी झालेल्या बांधकाम व्यावसायिकांकडून ३१ मार्चपर्यंत घरखरेदी केलेल्या ग्राहकांनी अर्ज भरून द्यायचा आहे. घरनोंदणीसाठी वेळ लागणार असल्याने अर्ज भरण्यासाठी आणखी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. मात्र घराची खरेदी ३१ मार्चपूर्वी करायला हवी. जून महिन्यानंतर सोडत काढली जाणार असून सहभागी झालेल्या ग्राहकांमधून भाग्यवान विजेत्याचे नाव घोषित केले जाईल. या भाग्यवंताला खरेदी केलेल्या घरासोबतच आणखी एक नवेकोरे घरजिंकण्याची संधी मिळेल. यासोबत परदेशी वारी तसेच इतर अनेक आकर्षक बक्षिसेही आहेत. या योजनेत सहभागी झालेल्या बांधकाम व्यावसायिकांची नावे व दूरध्वनी क्रमांकाची माहिती शनिवार, २१ मार्चच्या ‘लोकसत्ता-वास्तुरंग’मध्ये दिली जाणार आहे. वास्तुलाभ योजनेसाठी तुलसी इस्टेट हे टायटल पार्टनर, मोहन ग्रुप हे असोसिएट पार्टनर आणि  केसरी हे ट्रॅव्हल पार्टनर आहेत.
स्पर्धेचे नियम व अटींबाबतची माहिती ‘लोकसत्ता’च्या संकेतस्थळावर मिळू शकेल. लहानसे का होईना, पण मालकीचे घर असावे असे स्वप्न उराशी बाळगणाऱ्यांसाठी वेगाने विकसित होत असलेल्या परिसरातील घरांचा शोध घेण्याचा पर्याय या निमित्ताने उपलब्ध होणार आहे.