प्रख्यात ‘चाटे कोचिंग क्लासेस’चे मालक मच्छिंद्र चाटे (५२) यांना एका विद्यार्थिनीच्या विनयभंगाप्रकरणी गुरुवारी भोईवाडा पोलिसांनी अटक केली. दादर येथील कार्यालयात १७ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप त्यांचावर आहे. गुरुवारी न्यायालयाने त्यांची १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका केली.
चाटे क्लासेसच्या सायन शाखेतील बारावीच्या विद्यार्थ्यांची अभ्यासक्रम अपूर्ण राहिल्याबद्दल तक्रार होती. नोव्हेंबरनंतर वर्ग अनियमित होत असल्याने अभ्यासक्रम अपूर्ण राहिल्याचा त्यांचा आरोप होता. त्यासंदर्भात बुधवारी चाटे क्लासेसच्या दादर पूर्व येथील मुख्यालयात सायन शाखेचे विद्यार्थी, पालक आणि चाटेच्या व्यवस्थापनामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर संध्याकाळी ही पीडित तरुणी इतर पाच विद्यार्थी आणि काही पालक चाटे यांना त्यांच्या केबीनमध्ये भेटायला गेले होते. अभ्यासक्रम अपूर्ण राहिला असून लेक्चर्स नियमित होत नव्हती, त्याबद्दल त्यांनी चाटे यांना जाब विचारला होता. यावेळी संतप्त झालेल्या चाटे यांनी शिवीगाळ करत फिर्यादी मुलीचा ड्रेस खाली खेचला, असा आरोप त्यांच्यावर आहे.  या प्रकारानंतर केबीनबाहेर असलेल्या तिच्या काकांनी चाटे यांना मारहाणही केली. या प्रकारानंतर ही पीडित मुलगी आणि पालकांनी भोईवाडा पोलिसांत चाटे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी याप्रकरणी उपस्थित इतर विद्यार्थी आणि पालकांचे जबाब नोंदवून बुधवारी उशीरा चाटे यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. चाटे यांना मारहाण करणाऱ्या या फिर्यादी मुलीच्या काकाच्या विरोधात अदखलपात्र गुन्हाही दाखल केला असल्याची माहिती भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांनी दिली. गुरुवारी दुपारी मच्छिंद्र चाटे भोईवाडा पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यांना भोईवाडा न्यायालयात हजर केले असता त्यांची १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली.

Wardha Lok Sabha, Amar Kale,
वर्धा : “कुणी घर देता कां घर…”, अमर काळे यांची शोधाशोध; कार्यालयासाठी…
Abhishek Ghosalkar murder case
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा एसआयटीकडे द्या, तेजस्वी घोसाळकरांची उच्च न्यायालयात मागणी
I experienced a golden age in advocacy asserted Justice Bhushan Gavai
‘‘वकिली करताना मी सुवर्ण काळ अनुभवला,” न्यायमूर्ती भूषण गवई यांचे प्रतिपादन; म्हणाले, “नवोदित वकिलांनी…”
Rashmi Barve
रश्मी बर्वे प्रकरणावर बुधवारी सुनावणी, जातवैधता प्रमाणपत्रामुळे निवडणूक अर्ज रद्द