राज्य विधिमंडळाचे कामकाज १० एप्रिलपर्यंत चालविले जाणार असून प्रादेशिक असमतोलाबाबतच्या डॉ. विजय केळकर समितीच्या अहवालावर ७ एप्रिलला चर्चा होणार आहे.
विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठका गुरुवारी पार पडल्या. त्यात १० एप्रिलपर्यंतचे कामकाज ठरविण्यात आले आहे, अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी सभागृहात दिली. अधिवेशनाचा समारोप १० तारखेला होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.