राज्य सरकारकडून आगामी काळात पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसाठी मुंबईत २५ ते ३० हजार स्वस्त घरे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी झालेल्या कार्यक्रमात याबद्दलची माहिती दिली. राज्य सरकार मुंबई आणि मुंबईबाहेर पोलीस कर्मचाऱ्यांना स्वत:च्या हक्काचे घर मिळवून देण्यासाठी टप्प्याटप्प्याने घरे उपलब्ध करून देणार आहे. यापैकी २५ ते ३० हजार स्वस्त घरे मुंबईत बांधण्यात येणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या घरांच्या खरेदीसाठी पोलीस कर्मचाऱ्यांना कर्जसुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय, घाटकोपर येथे पोलिसांसाठी स्मार्ट टाऊनशिपही उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या टाऊनशिपमध्ये शिक्षण आणि आरोग्यासह सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध असतील. तसेच पोलीस दलातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी महात्मा फुले योजनेतून मोफत उपचारांची सोय करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Pune model of co-working space From start-ups to large companies everyone is getting preference
को- वर्किंग स्पेसचे पुणेरी मॉडेल! स्टार्टअपपासून मोठ्या कंपन्यांपर्यंत सर्वांचीच मिळतेय पसंती
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी
Kanjurmarg metro car shed, MMRDA, additional space
एमएमआरडीए कांजूरमार्गमधील जागेच्या प्रतीक्षेतच, कारशेडसाठी अतिरिक्त जागेची राज्य सरकारकडे मागणी
Kinetic Green introduces E Luna an electric scooter for gig workers
गिग’ कामगारांसाठी आता ई-लुना, कायनेटिक ग्रीन कंपनीचे पाऊल; १३० दुचाकींचे वितरण