गुजरातच्या धर्तीवर पूरक आहार देण्याची योजना

राज्यातील तीव्र कुपोषित (सॅम व मॅम) कमी वजनाच्या बालकांसाठी गुजरातच्या धर्तीवर विशेष पूरक आहार देण्याची योजना राबविण्यात येणार आहे. ‘युनिसेफ’कडून जगभरातील तीव्र कुपोषित बालकांसाठी अशा प्रकारचा आहार दिला जातो. नंदुरबार येथील धडगाव व अक्कलकुवा येथे प्रायोगिक तत्त्वावर ‘टाटा ट्रस्ट’च्या माध्यमातून हा विशेष पूरक आहार प्रकल्प राबविण्यात आला होता. त्याच्या यशस्वितेमुळे शासनाने संपूर्ण राज्यात ‘एनर्जी डेन्स न्यूट्रिशस फूड’ पूरक पोषण आहार योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी
The district administration announced the list of campaign materials along with food items in the list fixed to account for Lok Sabha election expenses pune
जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात आणली ‘स्वस्ताई’; जाणून घ्या कशी?
supreme court
पुरवणी आरोपपत्रांवरून ईडीची खरडपट्टी; जामीन मिळण्याच्या अधिकाराचे हनन- सर्वोच्च न्यायालय
There is only a month stock of tuberculosis drugs and the central government has ordered the states to purchase drugs at the local level
 क्षयरोग औषधांचा महिनाभराचाच साठा; स्थानिक पातळीवर औषधे खरेदी करण्याचे केंद्र सरकारचे राज्यांना आदेश

महाराष्ट्राच्या ग्रामीण त्यातही सोळा आदिवासी जिल्ह्य़ांमध्ये तीव्र व अतितीव्र कमी वजनाच्या बालकांचा प्रश्न गेली अनेक वर्षे सतावत होता. वेळोवेळी न्यायालयानेही याबाबत शासनावर ताशेरेही ओढले होते. राज्य तसेच केंद्र शासनाने यासाठी तज्ज्ञ समिती नेमून पूरक आहाराचे काही प्रयोगही करून पाहिले. कुपोषित बालके ही पूर्ण आहार खाऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांना आवश्यक असलेली प्रथिने, ऊर्जा व लोह तसेच मायक्रोन्यूट्रियंट्स मिळत नाहीत.  टाटा ट्रस्टने याबाबत नंदुरबार जिल्ह्य़ातील दोन तालुक्यांत सहा केंद्रांवर तीव्र व अतितीव्र कमी वजनाच्या बालकांना हा विशेष पूरक आहार दिल्यानंतर बालकांच्या आरोग्यात सुधारणा झाल्याचे ‘टाटा ट्रस्ट’ व ‘युनिसेफ’च्या अहवालात म्हटले आहे.

गुजरात, छत्तीसगड तसेच मध्य प्रदेश या राज्यांनीही कुपोषित बालकांची समस्या सोडविण्यासाठी ही विशेष पोषण आहार योजना राबविण्यास सुरुवात केली असून गुजरातमध्ये ‘अमूल’नेही हा पोषण आहार बनविण्यास सुरुवात केली आहे. राज्यात ही योजना राबविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका बैठकीचे आयोजन केले होते. त्यानंतर संबंधित विभागाने राज्यात हा उपक्रम राबविण्यासाठी निविदाही काढली असून जवळपास दोनशे टन विशेष पोषण आहार तीव्र कमी वजनाच्या बालकांसाठी घेतला जाणार आहे. तथापि काही स्वयंसेवी संघटना ही योजना राबवली जाऊ नये यासाठी झारीतील शुक्राचार्य बनण्याचे काम करत असून या तीव्र कुपोषित बालकांना पूर्ण जेवण मिळाले पाहिजे, अशी मागणी ते करत आहेत.

आहारतज्ज्ञांची मदत

‘जागतिक आरोग्य संघटने’ने यासाठी तयार केलेल्या विशेष पूरक आहाराच्या धर्तीवर ‘एनर्जी डेन्स न्यूट्रिशस फूड’ हा विशेष आहार व त्याच्या पाककृतीसाठी सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. अलका जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आहारतज्ज्ञांचा समावेश असलेल्या समितीच्या माध्यमातून आहाराची पाककृती निश्चित करण्यात आली.यात दूध व शेंगदाणे यांचा समावेश असलेला विशेष पोषण आहार तयार करण्यात आला.