पोलिसांच्या वारसांना पोलीस शिपाई भरतीत पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच २०११मध्ये भरती झालेल्या मात्र नियुक्ती न दिलेल्या ५२९ उमेदवारांनाही सेवेत सामावून घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी दिली. तसेच पोलिसांना यापुढे गणवेश साहित्याऐवजी गणवेश भत्ता देण्याचा निर्णयही घेण्यात आला असून १ लाख ८८ हजार ८३२ पोलिसांना याचा फायदा होणार आहे.
पोलीस दलात सेवा बजावणारे शिपाई निवृत्त झाल्यानंतर वा त्यांचा अकाली मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला आधार नसतो. त्यामुळे पोलीस शिपायांच्या वारसांना नोकरीत आरक्षण देण्याची मागणी सातत्याने केली जात होती. त्यानुसार पोलिसांच्या मुलांना शिपाई भरतीमध्ये ५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अंशकालीन पदवीधरांसाठी राखीव समांतर आरक्षणापैकी तीन टक्के आरक्षण हे कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी तर सेवेत कार्यरत असताना अकाली निधन झालेल्या पोलिसांच्या मुलांना अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी दोन टक्के आरक्षण ठेवण्यात आले आहे. २०११मध्ये पोलीस भरतीत निवड झालेल्या मात्र अद्याप नियुक्ती न मिळालेल्या ५२० उमेदवारांना सेवेत सामावून घेण्यात येईल. त्यामध्ये १५८ जणांना पोलीस सेवेत तर ३७१ जणांना कारागृह सेवेत सामावून घेण्यात येणार आहे.

supreme court on private hospitals bed
राखीव खाटांच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाकडून खासगी रुग्णालयांची कानउघडणी; म्हणाले, “ही रुग्णालये सरकारी अनुदान घेतात पण…”
mumbai high court marathi news, cm eknath shinde marathi news
शहीदांच्या कुटुंबीयांप्रती मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा, शहीद मेजर सूद यांच्या पत्नीच्या मागणीबाबत उच्च न्यायालयाची टिपण्णी
fraud with 628 investors
गुंतवणुकीच्या नावाखाली ६२८ गुंतवणूकदारांची ५७९ कोटींची फसवणूक, आरोपी सनदी लेखापालाला ८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
The crime branch police demanded a bribe of 10 lakhs crime news
गुन्हे शाखेच्या पोलिसाने मागितली १० लाखांची लाच; काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल