ऐरोलीमधील गोठवली गावातील इंद्रायणी महिला मंडळाच्या वतीने महिलांनी परिसरात मॅक्सी घालून न फिरण्याचा काढलेला अजब फतवा अखेर मंगळवारी मागे घेण्यात आला.
वृत्तपत्रांने या विषयावर आवाज उठवल्यानंतर मंडळाकडून जाहिर माफी मागत हा फतवा मागे घेण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. २१ व्या शतकाती सायबर सिटी म्हणून ओळखल्या जाणारी नवी मुंबई. पुणे पाठोपोठो विद्येचे माहेर घर म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या या सुक्षिशित नगरीत महिलांनीच महिलांच्या हक्कावर गदा आणण्याचा प्रकार या फतव्याच्या माध्यमातून समोर आला होता. या फतव्यानुसार महिलांनी परिसरातून फिरताना मॅक्सी घालण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. तसेच या आदेशाचे उल्लघंन करणाऱ्या महिलेवर ५०० रुपये दंडांची कारवाई करण्याचे जाहिर करण्यात आले होते. महिला वर्गानेच महिलांच्या हक्कावर एक प्रकारे कुरघोडी केल्याने सर्व स्तरातून टिका करण्यात आली होती. अखेर मंगळवारी महिला मंडळाने सदर प्रकरणी जाहिर माफी मागितली आहे.मंडळाने लिहिलेला हा फतव्याचा बोर्ड रबाले पोलिसांनी ताब्यात घेतला असून या प्रकरणी पोलीसांनी महिला मंडळाच्या सदस्यांना आणि ग्रामस्थांना बोलावले असता त्या ठिकाणी महिला मंडळाने आपल्याकडून ही चूक झाली असून सामाजिक हिताच्या दृष्टीने सदरचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले.या प्रकरणी मंडळाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी लेखी माफीनामा पोलीसांना दिला आहे. दरम्यान या प्रकरणी विधी आधिकाऱ्यांशी चर्चा सुरु आहे.असून कायदेशीर कारवाई होत असेल तर ती केली जाणार असल्याचे पोलीसांनी स्पष्ट केले.