देशभरात जूनमध्ये सरासरीपेक्षा १५ टक्के पाऊस जास्त झाला असला तरी गेल्या आठवडय़ापासून राज्यातील पावसाचे चित्र निराशाजनक आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात २७ ते ३६ टक्के पाऊस पडला असून मराठवाडय़ात अवघा आठ टक्के पाऊस झाला. पुढील पाच दिवसात पावसाच्या केवळ तुरळक सरी अपेक्षित असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.
मान्सूनच्या पहिल्या टप्प्यात जोरदार पावसामुळे राज्यातही सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. संपूर्ण जून महिन्याचा विचार करता कोकणात १२ टक्के, मध्य महाराष्ट्रात १७ टक्के तर विदर्भात तब्बल ४८ टक्के जास्त पावसाची नोंद झाली. मराठवाडय़ात मात्र २० टक्के पाऊस कमी पडला. जूनमधील ही स्थिती असली तरी जूनच्या शेवटच्या आठवडय़ाची पावसाबाबतची स्थिती निराशाजनक आहे.  गेल्या आठवडय़ाभरात मराठवाडय़ात  आठ टक्के पावसाची नोंद झाली.
२५ जून ते १ जुलैदरम्यान पावसाची टक्केवारी
विभाग    पडलेला पाऊस    सरासरी     टक्के
कोकण     ९० मिमी     २५४ मिमी     ३५ टक्के
मध्य महाराष्ट्र     १६ मिमी     ४७ मिमी     ३६ टक्के
मराठवाडा     ३.३ मिमी     ४० मिमी    ८ टक्के
विदर्भ     १५ मिमी     ६५ मिमी     २३ टक्के