महावितरणने वीज दरवाढीचा प्रस्ताव आयोगाकडे सादर केलेला असला तरी मार्च महिन्यात घरगुती ग्राहकांना प्रति युनिट ५० पैसे कमी दराने वीज उपलब्ध होणार आहे. तर अशाच प्रकारची सवलत सर्व वर्गातील ग्राहकांना लागू होणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.
वसुलीची मुदत संपल्यामुळे महानिर्मितीच्या दरापोटी लागू असलेली व अंतरिम आकाराची रक्कम मार्चच्या देयकामध्ये लागू होणार नाही. यामुळे सर्व वर्गातील ग्राहकांना वीज बिलात दिलासा मिळणार आहे.
घरगुती ग्राहकांना ० ते १०० युनिट वीज वापर असणाऱ्यांना प्रति युनिट ४.१६ रुपयांऐवजी ३.६५ रुपये आणि १०१ ते ३०० युनिट वीज वापर असणाऱ्यांना प्रति युनिट दर ७.३९ रुपयांवरून ६.५४ रुपये होणार
आहे.