मुंबईच्या फुटपाथवरील कुठल्याही सँडविचवाल्याकडे किंवा हॉटेलमध्ये गेल्यावर साधारण किती सँडविचचे प्रकार त्यांच्या मेन्यूमध्ये असतात? दहा, वीस, तीस? पण तुम्हाला जर कोणी सांगितलं की, तुम्हाला सँडविचच्या तब्बल पंचाऐंशी प्रकारांमधून एक निवडायचंय तर? आकडा ऐकून चकित झालात ना? पण हे खरं आहे. सँडविचचे एवढे प्रकार एकाच ठिकाणी मिळणारं कदाचित मुंबई शहरातलं हे एकमेव ठिकाण. ग्रँट रोड पूर्व येथील प्रॉक्टर रोडवर श्यामराव विठ्ठल बँकेसमोर असलेलं मामाजी सँडविच.

त्यांच्याकडे असलेल्या पंचाऐंशी प्रकारांपकी तुम्ही कुठल्याही प्रकाराची ऑर्डर दिलीत, तर पुढील पाच ते सात मिनिटांमध्ये तुमच्यासमोर ते सँडविच सादर केलं जातं. आपल्याला वाटत असेल की, एवढे प्रकार येथे असले तरी रोज ते खाणार कोण? पण मालक हमीद शेख सांगतात, रोज हे सर्व प्रकार एकदा तरी बनवतात. यावरून त्यांच्याकडे सँडविच खायला येणाऱ्या खवय्यांचा आणि त्यांच्या आवडीनिवडीचा अंदाज येईल. सकाळी नऊ ते रात्री नऊ असं दिवसभर तुम्हाला येथे सँडविच खायला मिळतं. केवळ रविवारी या भागात लोकांची वर्दळ कमी असल्याने त्या दिवशी सुट्टी असते.

student played with bench to hold the rythm on the harmonium played by teacher
Video : शिक्षकाच्या हार्मोनियमवर ठेका धरण्यासाठी विद्यार्थ्याने वाजवला बेंच, गुरू शिष्याच्या जुगलबंदीचा व्हिडीओ एकदा पाहाच
Onion Peels Jugadu Water For Jaswandi Plant Hibiscus Will Get Lots Of Buds Kaliyan With These Marathi Gardening Hacks
Video: जास्वंदाच्या रोपाला कांद्याच्या सालींचं ‘हे’ खत दिल्याने भरभर येतील कळ्या; फुलांनी बहरून जाईल कुंडी
how to make crunchy karela fry recipe
Recipe : अशा पद्धतीने कारल्याच्या काचऱ्या बनवाल तर, कडवटपणा झटक्यात विसरून जाल! ही रेसिपी पाहा…
how to make moringa curry recipe in marathi
Recipe : शेवग्याच्या शेंगांपासून बनवा पौष्टिक ‘शेकटवणी’; पाहा या आंबट-गोड पदार्थाचे प्रमाण अन् रेसिपी

हमीद शेख हे आखाती देशामध्ये मोठय़ा हॉटेलमध्ये काही काळ कामाला होते; परंतु काही वर्षांपूर्वी ती नोकरी सोडून ते मुंबईत आले आणि त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला त्यांच्याकडे काही मोजकेच आणि नेहमीचेच प्रकार मिळायचे; परंतु हळूहळू विविध प्रयोग करून त्यांनी वैशिष्टय़पूर्ण सँडविचेसचा शोध लावला.

सँडविचसोबत दिली जाणारी गाíलक चटणी विशेष असते. ती कशापासून आणि कशा प्रकारे तयार होते याची माहिती हमीदभाईंनी आम्हाला दिली असली तरी त्याच्या वेगळेपणामुळे त्याची रेसिपी आम्ही येथे शेअर करत नाही आहोत; पण ती सँडविचची लज्जत आणखी वाढवते हे मात्र नक्की.

नावाप्रमाणेच इथल्या प्रत्येक सँडविचची एक वेगळी चव आहे. चॉकलेट सँडविच खाताना त्याच्या पावाचा कुरकुरीतपणा आणि डार्क चॉकलेटची चव संपूर्ण जिभेवर पसरते. पिझ्झा सँडविच खाताना त्याचा आंबट-गोड स्वाद पिझ्झा आणि सँडविचपेक्षा वेगळं काही तरी खाल्ल्याची अनुभूती देतो, तर जंगली सँडविचचे चार लेअर पाहूनच तुमचं पोट भरतं आणि शेवटी ते संपता संपत नाही.  सँडविचसाठी चार वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेड त्यांच्याकडे असतात. पांढरा चौकोनी ब्रेड, गव्हाचा ब्रेड, ग्रिलसाठी त्रिकोणी ब्रेड आणि पिझ्झा सँडविचसाठी गोलाकार आकाराचा ब्रेड. हे सर्व ब्रेड जवळच्याच नागपाडा येथील इराकी बेकरीमधून ते येतात.

मामाजीची सँडविच पार्सल करण्याचीही पद्धतही वेगळी. पार्सल करताना ते पांढऱ्या कागदी प्लेटवर ठेवून त्यावर टिश्यू पेपर लावला जातो. दोन वेगळ्या प्रकारचे सॉस आणि चटणीची पाकिटं ठेवून ती प्लेट अतिशय अलगदपणे खाकी रंगाच्या कागदी पिशवीत आत सरकवली जाते आणि त्याला स्टेपलच्या साहाय्याने बंद केलं जातं. लोकांची आवड आणि आवश्यकतेनुसार चीज, मेओनिज, पनीर, बाब्रेक्यू सॉस जास्तीचे पसे घेऊन दिलं जातं. इतके वैशिष्टय़पूर्ण प्रकार येथे मिळत असले तरी त्यांची किंमत अवाजवी नाही. साधं सँडविच केवळ ३० रुपये आणि जंगली सँडविच अवघ्या १५० रुपयांना मिळतं. त्यामुळेच की काय, आजूबाजूच्या परिसरातील शाळा, महाविद्यालयांतील मुलांची येथे गर्दी असते आणि व्यापारी वर्गही आवर्जून पार्सल मागवतो. मामाजी सँडविचची आणखी एक शाखा ताडदेव येथील एसी मार्केटमध्येही आहे. या दुकानावर पूर्वी  क्रिकेटपटू रोहित शर्मा आपल्या मित्रांसोबत आवर्जून सँडविच खायला येत असे.

सँडविचचे ८५ प्रकार कोणते?

जंगली सँडविच, पिझ्झा ग्रिल सँडविच, चॉकलेट, चॉकलेट चीज, बाब्रेक्यू कॉर्न, बाब्रेक्यू मशरूम, चिली मिली कॉर्न, समोसा कुरकुरे, वेफर चीझ, कुरकुरे चीज, मुंबई ट्रिपल, पहाडी ग्रिल सँडविच. याशिवाय नेहमीच्या साध्या सँडविचचे १५ प्रकार, ग्रिल सँडविचचे ८ प्रकार, पिझ्झा ग्रिल सँडविचचे ५ वेगवेगळे प्रकार, मेओनिज सँडविचचे ९ प्रकार, कॉर्न म्हणजे मकॅच्या सँडविचचे ७ प्रकार, जैन सँडविचचे १७ प्रकार अशी तब्बल ८५ प्रकारची सँडविचेस येथे मिळतात.

पिझ्झा ग्रिल सँडविच कसे तयार होते?

बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कँप्सीकम, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, मीठ, पिझ्झा पास्ता, पनीरचे बारीक तुकडे हे सर्व पदार्थ एका बाऊलमध्ये एकजीव केले जातात. गोल आकाराच्या स्लाइस ब्रेडला बटर आणि चटणी लावून त्यावर हे मिश्रण पसरवलं जातं. त्यानंतर हे मिश्रण संपूर्णपणे झाकलं जाईल इतकं चीज त्यावर किसलं जातं. वरून कव्हर करायच्या ब्रेडला पिझ्झासाठीची वेगळी चटणी लावली जाते. त्यानंतर ते टोस्टरमध्ये ठेवून साधारण तीन मिनिटे टोस्ट केलं जातं. गरमागरम सँडविच टोस्टरमधून बाहेर काढून त्याचे सहा समान भाग केले जातात आणि तुमच्यासमोर चटणीसोबत ते सादर केलं जातं.

  • कुठे – मामाजी सँडविच, प्रॉक्टर रोड, श्यामराव विठ्ठल बँकेसमोर, ग्रँट रोड (पूर्व)
  • वेळ – सकाळी ९ ते रात्री ९