अनैतिक संबंधाला अडथळा येतो म्हणून प्रेयसीच्या चार वर्षीय मुलाची छळवणूक करणाऱ्या नराधमाला विक्रोळी पोलिसांनी अटक केली आहे. विक्रोळीच्या टागोर नगर येथे अनिता जोशी (नाव बदललेले) ही महिला आपला प्रियकर अमित सॅलियन (२७) याच्यासह भाडय़ाच्या घरात रहात होती. अनिताला पहिल्या पतीपासून असलेला चार वर्षांचा मुलगाही तिच्यासोबत रहायचा. बुधवारी स्थानिक रहिवाशांना अनिताच्या घरातून मुलाच्या जोराजोरात रडण्याचा आवाज येत होता. त्यांनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला माहिती दिली. या मुलाच्या अंगावर आणि गुप्तांगावर सिगारेटचे चटके दिलेले आढळून आले. अमित नेहमी मुलाला अमानुष मारहाण करायाच तसेच भिंतीवर डोके आपटून मारहाण करायचा अशी माहिती रहिवाशांनी दिली.