धावती लोकल पकडण्याच्या प्रयत्नात एका ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दादर रेल्वे स्थानकात हा अपघात घडला.
शफीउद्दीन अब्दुल गनी असे अपघतात मृत पावलेल्या प्रवाशाचे नाव आहे. गनी हे आपल्या पत्नी आणि मुलांसह सकाळी दादर स्थानकात लोकल पकडत होते. पत्नी आणि मुलांना लोकमध्ये चढविल्यानंतर लोकलने वेग पकडला. त्यामुळे ते धावत लोकल पकडण्याचा प्रयत्न करू लागले. लोकलचा वेग आणखी वाढल्याने लोकलसह धावताना ते अचानक प्लॅटफॉर्मच्या पोकळीत पडले. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
काहीच दिवसांपूर्वी मुंबईच्या बोरिवली स्टेशनवर धावत्या एक्स्प्रेसमधून उतरताना एका महिलेचा पडून मृत्यू झाला होता. रेल्वे अपघातांच्या वाढत्या संख्येमुळे प्रवाशांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.