स्थानिक रहिवाशांच्या विरोधाला न जुमानता धारावी पुनर्विकास प्रकल्प राबवला जात असल्याच्या प्रश्नावर धारावी बचाव आंदोलनाच्या प्रतिनिधींसह गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांची शुक्रवारी बैठक होणार आहे.धारावी पुनर्विकासात मूळ रहिवाशांना ४०० चौरस फुटांचे घर मिळावे अशी ‘धारावी बचाव आंदोलना’ची मागणी आहे.