रेल्वेच्या हार्बर मार्गाच्या विस्तारासाठी रविवारी सकाळी ७ वाजल्यापासून ते दुपारी ४ वाजेपर्यंत जोगेश्वरी स्थानकापासून डाऊन मार्गावर ९ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान धीम्या मार्गावरील अंधेरी व गोरेगाव या लोकलसेवा मध्य डाऊनवरील जलद मार्गावर चालविण्यात येणार आहे. या लोकल राम मंदिर स्थानकावर थांबणार नाही, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

पश्चिम रेल्वे

कुठे :  जोगेश्वरी ते डहाणू रोड दरम्यान डाउन जलद मार्गावर

कधी : सकाळी ७.०० ते सायं. ४.०० वा.

  • परिणाम – ब्लॉकदरम्यान डहाणू रोड, विरार, वसई रोड, भाईंदर, बोरीवली, मालाड या मार्गावरील जलद लोकल सेवा अंधेरी ते बोरीवली दरम्यान सर्व डाउन जलद लोकलससेवा ३० एप्रिल ते ७ मे पर्यंत जोगेश्वरी स्थानकावर थांबेल. मात्र यादरम्यान डाउन जलद मार्गावर काही अडथळा आल्यास या मार्गावरील लोकल डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येईल. या परिस्थितीत डाउन जलद लोकल जोगेश्वरी स्थानकावर थांबेल.
  • ३० एप्रिल ते ७ मे दरम्यान डाउन धीम्या मार्गावरील सर्व लोकल जोगेश्वरी स्थानकावर थांबणार नाही. याकारणाने प्रवासी राम मंदिर ते जोगेश्वरी दरम्यान अप मार्गावर प्रवास करू शकतील. ब्लॉक असल्याकारणाने काही लोकल रद्द करण्यात येतील. याची सूचना सर्व स्थानकावर देण्यात येतील. ब्लॉकची सर्व माहिती स्थानक प्रमुखाकडे उपलब्ध असेल.