अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईतील गणेश विसर्जनाच्या मिरवणुका पाहण्यासाठी उपनगर व परिसरातून येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी या रविवारी, २७ सप्टेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही.

या रविवारी मध्य, हार्बर तसेच पश्चिम रेल्वेमार्गावरील महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी कामे होणार नसल्याने गाडय़ा वेळापत्रकाप्रमाणे चालतील. मात्र, पश्चिम रेल्वेवर मध्यरात्री मेगाब्लॉकची कामे हाती घेण्यात येणार आहेत. पण या मेगाब्लॉकमुळे उपनगरीय रेल्वेच्या वेळापत्रकावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे दोन्ही रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.