मध्य, हार्बर आणि पश्चिम या तीनही मार्गावर महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी काम करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे, असे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.
मध्य रेल्वे
कुठे – माटुंगा ते मुलुंड या स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर
कधी – सकाळी १०.४५ ते दुपारी ३.१५ वा.
परिणाम – ब्लॉकदरम्यान मुंबईहून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जलद गाडय़ा धीम्या मार्गावरून चालवल्या जातील. या गाडय़ा शीव आणि मुलुंड या स्थानकांदरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील. त्यानंतर या गाडय़ा डाउन जलद मार्गावर वळवल्या जातील.
हार्बर मार्ग
कुठे – चुनाभट्टी ते छत्रपती शिवाजी टर्मिनस तसेच वडाळा रोड ते माहीम या स्थानकांदरम्यान अप आणि डाउन मार्गावर
कधी – सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० वा.
परिणाम – ब्लॉकदरम्यान मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते अंधेरी/वांद्रे आणि मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते पनवेल/वाशी/बेलापूर या दरम्यान अप आणि डाउन मार्गावरील वाहतूक बंद राहील. मात्र प्रवाशांच्या सेवेसाठी पनवेल ते कुर्ला यांदरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. अंधेरी, वांद्रे येथे जाणाऱ्या प्रवाशांना पश्चिम रेल्वे किंवा मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वे
कुठे – चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या स्थानकांदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर
कधी – सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वा.
परिणाम – ब्लॉकदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावरील गाडय़ा अप आणि डाउन धीम्या मार्गावरून धावतील. या गाडय़ा चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील.