मध्य आणि पश्चिम मार्गावर दर रविवारप्रमाणे या रविवारीही काही महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी कामांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे.
त्यामुळे या मार्गावरील काही सेवा रद्द राहणार असून या दोन्ही मार्गावरील वाहतूक २०-२५ मिनिटे उशिराने सुरू राहणार असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.  या रविवारी हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार नाही.
मध्य रेल्वे
कुठे – मुलुंड ते माटुंगा या स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर.
कधी – सकाळी ११.४५ ते दुपारी ४.१५ वा.
परिणाम – ब्लॉकदरम्यान मुंबईकडे जाणाऱ्या सर्व जलद गाडय़ा ठाणे ते माटुंगा यादरम्यान अप धिम्या मार्गावरून चालवल्या जातील. या गाडय़ा परळ स्थानकापर्यंत सर्व स्थानकांवर थांबतील. परळनंतर या गाडय़ा पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. तर मुंबईहून सुटणाऱ्या डाऊन जलद गाडय़ा त्यांच्या नेहमीच्या थांब्यांशिवाय भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड या स्थानकांवर थांबतील. तसेच अप आणि डाऊन धिम्या व जलद मार्गावरून जाणाऱ्या सर्व गाडय़ा नियोजित वेळेपेक्षा २० ते २५ मिनिटे उशिराने धावतील.
पश्चिम रेल्वे
कुठे – चर्चगेट ते मुंबई सेंट्रल यादरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर.
कधी – सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वा.
परिणाम -ब्लॉकदरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावरील गाडय़ा चर्चगेट ते मुंबई सेंट्रल यांदरम्यान अप व डाऊन जलद मार्गावर चालवल्या जातील. त्यामुळे जलद तसेच धिम्या मार्गावरील काही गाडय़ा रद्द राहतील.