*कुठे – मुलुंड व माटुंगा स्थानकांदरम्यान जलद मार्गावर
*कधी- सकाळी ११.३० ते दुपारी ४ पर्यंत
*परिणाम – ठाणे स्थानकावरून या वेळेत सुटणाऱ्या अप जलद गाडय़ा मुलुंड ते परळ स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर वळवल्या जातील. परळपर्यंत त्या सर्व स्थानकांवर थांबतील आणि परळ स्थानकापासून पुन्हा अप जलद मार्गावर धावतील. या गाडय़ा त्यांच्या नियोजित स्थळी २० मिनिटे उशिराने पोहचतील. सीएसटी स्थानकावरून या वेळेत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील गाडय़ा त्यांच्या नियोजित थांब्यांशिवाय घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांवरही थांबतील व त्यांच्या निर्धारित स्थळी १५ मिनिटे उशिराने पोहचतील. सीएसटीवरून सुटणाऱ्या आणि तेथे पोहचणाऱ्या सर्व धिम्या गाडय़ा त्यांच्या नियोजित स्थानकावर वेळापत्रकापेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहचतील.
*कुठे – बोरिवली व गोरेगाव स्थानकांदरम्यान अप व डाऊन धिम्या मार्गावर
*कधी – स. १०.३५ ते दु. ३.३५ पर्यंत
*परिणाम – अप व डाऊन मार्गावरील सर्व धिम्या गाडय़ा बोरिवली व गोरेगाव स्थानकांदरम्यान जलद मार्गावर धावतील. या काळात काही अप व डाऊन गाडय़ा रद्द करण्यात येतील. या काळात गाडय़ा बोरिवली स्थानकावर ३, ४, ५, ६ किंवा ६ अ यापैकी कुठल्या तरी फलाटावरून सोडल्या जातील व तेथे पोहोचतील.
*कुठे – कुर्ला ते चुनाभट्टी दरम्यान अप व डाऊन मार्गावर
*कधी – स. ११.२० ते दु. ३.१० पर्यंत
*परिणाम – सीएसटी स्थानकावरून या वेळेत पनवेल/बेलापूर/वाशीकरिता सुटणाऱ्या डाऊन गाडय़ा आणि पनवेल/बेलापूर/वाशीकरिता सुटणाऱ्या अप गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत.
   कुर्ला ते पनवेल मार्गावर विशेष उपनगरी गाडय़ा सोडल्या जातील. या कालावधीत अप व डाऊन हार्बर लाइन सेवा चुनाभट्टी आणि गुरु तेगबहादूरनगर स्थानकांवर उपलब्ध राहणार नाहीत. हार्बर लाइनवरील प्रवाशांना स. १० ते दु. ४ या वेळेत मुख्य मार्गावर सीएसटी ते कुर्ला स्थानकांदरम्यान प्रवास करण्याची मुभा राहील.