*कुठे- मुलुंड ते माटुंगा अप जलद.
*कधी – सकाळी ११.३० ते दुपारी ४
*परिणाम- ठाण्यापासून अप जलद मार्गावरील वाहतूक अप धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहे. त्यामुळे उपनगरी गाडय़ा मुलुंड ते परळ दरम्यान सर्व स्थानकात थांबणार आहेत.
छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून सुटणाऱ्या डाऊन जलद गाडय़ा
घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड या स्थानकांवर थांबणार आहेत.

*कुठे – नेरुळ ते मानखुर्द अप आणि डाऊन मार्गावर
*कधी – सकाळी ११ ते दुपारी ३
*परिणाम- सीएसटीहून पनवेल, बेलापूर, वाशीच्या दिशेने सुटणाऱ्या गाडय़ांची वाहतूक तसेच पनवेल आणि बेलापूर येथून सीएसटीच्या दिशेने सुटणाऱ्या गाडय़ांची वाहतूक या वेळेत पूर्णपणे बंद राहणार आहे.  
    या कालावधीत छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मानखुर्द आणि ठाणे ते पनवेल मार्गावर विशेष गाडय़ा चालविण्यात येणार आहेत.
    या मेगाब्लॉकमुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांना या वेळेत ट्रान्स हार्बर मार्ग आणि मुख्य मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

*कुठे- सांताक्रूझ ते माहीम जंक्शन अप आणि डाऊन जलद मार्गावर
*कधी- सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५
*परिणाम- या कालावधीत अप आणि डाऊन जलद मार्गावरील गाडय़ा सांताक्रूझ ते माहीम या रेल्वेस्थानका दरम्यान धिम्या मार्गावरून चालविण्यात येणार आहेत. याच कालावधीत वांद्रे आणि खार रेल्वे स्थानका दरम्यानचे गेट नंबर १९ बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे येथून वाहनांना ये-जा करता येणार नाही.