मध्य रेल्वे

’मध्य रेल्वे
’कुठे? – कल्याण ते दिवा अप आणि डाउन जलद मार्गावर
’कधी? – सकाळी ११.०० ते दुपारी ४.०० वा.
’परिणाम – ब्लॉकदरम्यान कल्याण ते दिवा या मार्गावरील जलद गाडय़ांची वाहतूक अप व डाउन धीम्या मार्गावरून केली जाणार आहे. कल्याणहून मुंबईच्या दिशेने सुटलेल्या जलद गाडय़ा कल्याण-ठाणे या दरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील. ठाण्यापुढे त्या मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, दादर आणि भायखळा या स्थानकांवर थांबतील. तर मुंबईहून कल्याणच्या दिशेने सुटलेल्या जलद गाडय़ा आपल्या नेहमीच्या थांब्यांव्यतिरिक्त कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांवर थांबतील. तसेच या गाडय़ा ठाण्यापुढे सर्व स्थानकांवर थांबतील.

—-

’हार्बर मार्ग
’कुठे? – मशीद ते चुनाभट्टी आणि वडाळा रोड ते माहीम अप आणि डाउन मार्गावर
’कधी – स. १०.३० ते दु. ३.००
’परिणाम – ब्लॉकदरम्यान मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते पनवेल आणि मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते अंधेरी या मार्गावरील सर्व सेवा रद्द राहतील. प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल-कुर्ला यांदरम्यान काही विशेष सेवा चालवण्यात येतील. तसेच हार्बर मार्गावरील प्रवाशांना कुर्ला वा ठाणे मार्गे त्याच तिकिटावर प्रवास करता येणार आहे. त्याशिवाय अंधेरी-वांद्रे येथील हार्बर मार्गावरील प्रवाशांना पश्चिम रेल्वे व मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरून प्रवास करता येईल.

’पश्चिम रेल्वे
’कुठे? – चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप आणि डाउन धीम्या मार्गावर
’कधी? – सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वा.
’परिणाम – ब्लॉकदरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गावरील सर्व गाडय़ा अप व डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाडय़ा चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या स्थानकांदरम्यानच्या सर्व स्थानकांवर थांबणार आहेत.