मध्य रेल्वे
*कुठे – कल्याण- ठाणे अप धीम्या आणि सेमी फास्ट मार्गावर
*केव्हा – स. ११.३० ते दु. ४ पर्यंत
*परिणाम – सकाळी ११.०३ पासून दुपारी ३.५४ वाजेपर्यंत कल्याणहून सुटणाऱ्या अप धिम्या आणि सेमी फास्ट मार्गावरील गाडय़ा कल्याण व मुलुंड दरम्यान डाऊन जलद मार्गावर चालवल्या जातील व त्या कल्याण- मुलुंड दरम्यान डोंबिवली स्थानकावर थांबतील. अप धीम्या मार्गावरील सेवा कळवा, मुंब्रा, दिवा, कोपर व ठाकुर्ली स्थानकांसाठी उपलब्ध राहणार नाही. या स्थानकांवरील प्रवाशांना डोंबिवली किंवा ठाणे स्थानकांवरून प्रवास करण्याची मुभा राहील. सकाळी १०.०८ ते दुपारी २.४० दरम्यान सीएसटी स्थानकावरून सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सर्व गाडय़ा घाटकोपर, विक्रोळी, भांडुप व मुलुंड स्थानकांवर थांबतील. सकाळी १०.५० ते दुपारी ३.३६ दरम्यान ठाण्याहून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील गाडय़ा मुलुंड, भांडुप, विक्रोळी व घाटकोपर स्थानकांवर थांबतील.
हार्बर लाईन
*कुठे – नेरूळ- मानखुर्द अप आणि डाऊन हार्बर मार्गावर
*केव्हा – सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत
*परिणाम – सकाळी १०.१२ ते दुपारी २.४५ दरम्यान सीएसटी स्थानकावरून पनवेल/बेलापूर/वाशी साठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर लाईनवरील गाडय़ा, तसेच सकाळी १०.२० ते दुपारी ३.०४ या वेळेत पनवेल/बेलापूर/वाशी येथून सीएसटीसाठी सुटणाऱ्या अप हार्बर लाईनवरील गाडय़ा धावणार नाहीत. मेगाब्लॉकच्या काळात नेरूळ व मानखुर्द स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर लाईनच्या सेवा रद्द केल्या जातील. या काळात सीएसटी- मानखुर्द आणि ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे- पनवेलसाठी विशेष गाडय़ा धावतील. हार्बर लाईनवरील प्रवाशांना सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत ट्रान्स हार्बर किंवा मेन लाईनच्या मार्गावर प्रवास करण्याची मुभा राहील.
पश्चिम रेल्वे
*कुठे – चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान अप व डाऊन धीम्या मार्गावर
*केव्हा – सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५
*परिणाम – मेगाब्लॉकच्या काळात अप व डाऊन धिम्या मार्गावरील सर्व गाडय़ा चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान जलद मार्गावर चालवल्या जातील. या कालावधीत काही गाडय़ा रद्द करण्यात येतील.