मध्य रेल्वे
*कधी – रविवार, १४ जुलै २०१४. सकाळी ११.२० ते दुपारी ३.२०
*कुठे- भायखळा ते विद्याविहार डाऊन धिम्या मार्गावर
*परिणाम – भायखळा रेल्वे स्थानकापासूनची डाऊन धिम्या मार्गावरील वाहतूक डाऊन जलद मार्गावरून वळविण्यात येणार. यामुळे भायखळा ते विद्याविहार रेल्वे स्थानकांच्या दरम्यान गाडय़ा परळ, दादर, माटुंगा, शीव व कुर्ला या स्थानकांवर थांबणार.
    ठाण्याहून छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे सुटणाऱ्या (अप जलद) गाडय़ा मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला येथे थांबतील.
हार्बर रेल्वे
*कधी-रविवार, १४ जुलै २०१४. सकाळी ११ ते दुपारी ३
*कुठे- कुर्ला-वाशी अप आणि डाऊन मार्गावर
*परिणाम- डाऊन हार्बर लाईन मार्गावरील वाहतूक (छत्रपती शिवाजी टर्मिनसहून पनवेल, वाशी व बेलापूरच्या दिशेने) पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच अप हार्बर लाईन मार्गावरील वाहतूक (पनवेल, बेलापूर, वाशी येथून मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या दिशेने) सकाळी १०.२० ते दुपारी ३.०४ या वेळेत पूर्णपणे बंद राहणार आहे. या कालावधीत मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल मार्गावरील सेवा सुरू राहणार आहे.   सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ट्रान्स हार्बर आणि मेन लाईनवरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वे
*कधी- रविवार, २० जुलै २०१४.  सकाळी ८.३० ते दुपारी ४.३० आणि सकाळी ९ ते दुपारी ४.३०.
*कुठे- मुंबई सेंट्रल ते मरिन लाईन्स अप स्लो आणि डाऊन फास्ट मार्गावर
*परिणाम- डाऊन जलद मार्गावरील सर्व गाडय़ा मरिन लाईन्स ते मुंबई सेंट्रल या रेल्वेस्थानकादरम्यान डाऊन धिम्या मार्गावरून चालविण्यात येईल. तर या स्थानकांदरम्यान अप मार्गावरील सर्व गाडय़ा जलद मार्गावरून चालविण्यात येणार आहेत.