कुठे – वांद्रे ते अंधेरी दरम्यान अप तसेच डाऊन हार्बर लाइनवर १० ते ४ आणि वांद्रे ते माहीम दरम्यान अप व डाऊन हार्बर लाइनवर सकाळी ११ ते दु. ४ पर्यंत
परिणाम – या काळात चर्चगेट – अंधेरी – चर्चगेट दरम्यान धावणाऱ्या तसेच हार्बर मार्गावरील काही लोकल रद्द

कुठे – ठाणे ते कल्याण डाऊन जलद मार्गावर, १० ते ३
परिणाम – सकाळी ९.०८ ते दुपारी २.२५ या काळात छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून डाऊन जलद मार्गावरून सुटणाऱ्या सर्व गाडय़ा आपल्या नियोजित थांब्याव्यतिरिक्त घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, तसेच मुलुंड या स्थानकांवर थांबतील. तसेच ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावरून त्या सोडण्यात येतील. यादरम्यान गाडय़ा सर्व स्थानकांवर थांबतील.
ठाण्यावरून सकाळी १०.४६ ते दुपारी ३.२८ दरम्यान अप जलद मार्गावरून धावणाऱ्या गाडय़ा नियोजित थांब्याव्यतिरिक्त मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला या स्थानकांवर थांबतील. या गाडय़ा सुमारे १५ मिनिटे विलंबाने धावतील.
ठाण्याहून सकाळी ११.२१ ते दुपारी २.४३ या काळात सुटणाऱ्या मेल/ एक्स्प्रेस गाडय़ा ठाणा आणि कल्याण दरम्यान डाऊन धिम्या मार्गावरून धावतील.

कुठे : मानखुर्द ते कुर्ला अप आणि डाऊन मार्गावर, ११ ते ३
परिणाम – छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून डाऊन मार्गावरून सकाळी १०.२३ ते दुपारी ३.०१ या काळात पनवेल, बेलापूर, वाशीसाठी सुटणाऱ्या, तसेच सकाळी १०.२० ते दुपारी ३.०४ या काळात पनवेल, बेलापूर, वाशी येथून अप मार्गावरून छत्रपती शिवाजी टर्मिनससाठी सुटणाऱ्या गाडय़ा बंद ठेवण्यात येणार आहेत.