मुलुंड आणि माटुंगा या स्थानकांदरम्यान अप जलद मार्ग.
कधी: सकाळी ११.३० ते दुपारी ४ पर्यंत
परिणाम – ठाण्याहून स. १०.४६ ते दु. ३.५३ या वेळेत सुटणाऱ्या सर्व जलद गाडय़ा मुलुंड ते परळ दरम्यान अप धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. या गाडय़ा परळपर्यंत सर्व स्थानकांवर थांबतील. परळ स्थानकापासून त्या पुन्हा अप जलद मार्गावर धावतील आणि नियोजित ठिकाणी २० मिनिटे उशिरा पोहचतील. सीएसटीहून स. १०.०८ ते दु. २.५१ वाजेपर्यंत सुटणाऱ्या सर्व जलद गाडय़ा त्यांच्या नियोजित थांब्यांशिवाय घाटकोपर, विक्रोळी, भांडुप व मुलुंड स्थानकांवरही थांबतील आणि नियोजित स्थळी १५ मिनिटे उशिरा पोहचतील.
नेरूळ ते मानखुर्द अप व डाऊन मार्ग
कधी – सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत
परिणाम – सीएसटीहून स. १०.१२ ते दु. २.४५ या वेळेत पनवेल/ बेलापूर/ वाशीकरता सुटणाऱ्या डाऊन सेवा आणि पनवेल/बेलापूरहून स. १०.२० ते दु. ३.०४ या वेळेत सुटणाऱ्या अप गाडय़ा धावणार नाहीत. मात्र, ब्लॉकच्या वेळेत सीएसटी- मानखुर्द आणि ठाणे- पनवेल या मार्गावर विशेष गाडय़ा सोडल्या जातील. हार्बर लाईनवरील प्रवाशांना रविवारी  सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत ट्रान्स हार्बर किंवा मुख्य मार्गावरील गाडय़ांतून प्रवास करण्याची मुभा राहील.
बोरिवली व अंधेरी स्थानकांदरम्यान पाचवा मार्ग
कधी – स. १०.३५ ते दु. ३.३५ पर्यंत
परिणाम – मेगाब्लॉकच्या वेळेत अप व डाऊन दोन्ही दिशांच्या सर्व मेल/ एक्सप्रेस गाडय़ा बोरिवली व अंधेरी स्थानकांदरम्यान जलद मार्गावरून धावतील. या ब्लॉकमुळे दोन्ही दिशांच्या काही उपनगरीय सेवा रद्द करण्यात येतील.