मध्य रेल्वे
कधी – रविवार, २९ मार्च. सकाळी ११ ते दुपारी ३.४०
कुठे – कल्याण ते ठाणे अप जलद मार्गावर
परिणाम – गाडय़ा १५ ते २० मिनिटे उशिराने धावतील
बाहेरगावच्या गाडय़ांबाबतचे बदल – ५०१०४ रत्नागिरी-दादर पॅसेंजर दिवापर्यंतच थांबविण्यात येईल आणि ५०१०३ दादर-रत्नागिरी पॅसेंजर दिवा स्थानकावरून रविवारी सुटेल.

हार्बर रेल्वे
कधी – रविवारी, २९ मार्च. सकाळी ११.१० ते दुपारी ३.१०
कुठे – सीएसटी ते कुर्ला (डाऊन)आणि वडाळा ते वांद्रे (अप आणि डाऊन)
परिणाम – १०.२८ ते ३.३३ दरम्यान वांद्रे-अंधेरी ते सीएसटी (डाऊन) सेवा बंद असेल. तसेच, सीएसटी-वांद्रे-अंधेरी (अप) सेवा १०.४० ते ४.१३ दरम्यान बंद राहील. तसेच, गाडय़ा ११ ते ४.३० दरम्यान १० मिनिटे उशिराने धावतील.
हार्बर मार्गावरील वांद्रे-अंधेरीच्या प्रवाशांना मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेने १० ते सायंकाळी ६ दरम्यान प्रवास करण्याची मुभा असेल.
बेस्टच्या अतिरिक्त गाडय़ा – मेगाब्लॉकमुळे बेस्टतर्फे १०(लिमिटेड), २० (लिमिटेड), ४४, ४ (लिमिटेड), ८४(लिमिटेड), २०२ (लिमिटेड) या अतिरिक्त गाडय़ा सोडण्यात येणार आहेत.