महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई आणि कोकण गृहनिर्माण व क्षेत्रनिर्माण मंडळातर्फे एकूण १०६३ घरांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. यापैकी मुंबई विभागातील ९९७ घरांची तसचे अंध व अपंगांसाठीच्या दोन्ही विभागातील ६६ घरांसाठीची सोडत आज (रविवार, ३१मे) रोजी सकाळी १० मे दुपारी २ या वेळेत काढण्यात येणार आहे. ही सोडत संगणकीय पद्धतीने वांद्रे येथील रंगशारदा नाटय़गृहात काढली जाणार आहे.
यंदा मुंबई व कोकण विभागाच्या १०६३ घरांसाठी १ लाख २५ हजार ८४४ अर्ज पात्र ठरले आहेत. अर्जदार नाटय़गृहात उपस्थित राहून सोडतीचा लाभ घेऊ शकतील किंवा नाटय़गृहाबाहेरील मंडपावरील स्क्रीनमध्येही सोडत पाहू शकतील. हा निकाल सायंकाळी ६ नंतर ’३३ी१८.ेिँं.ॠ५.्रल्ल या संकेतस्थळावरही उपलब्ध होईल.
म्हाडाची सोडत यंदा प्रथमच मुंबईकरांना घरबसल्या अनुभवता येणार आहे. या सोडतीचे थेट वेबकास्ट प्रक्षेपण लोकांना ेिँं.४ूं२३.्रल्ल या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.
सोडतीचा क्रम (वेळ व  योजना संकेत क्रमांक)
*स. १० ते दु. १२.३० – ३१०, ३११, ३१२, ३१३, ३१४, ३१५, ३१६
*दु. १२.३० ते २.३० – २५७ अ, २५८ अ, २६० अ, २६५ब, २६६ब, २६७ब, २६८ ब, २७०ब, २७१ब, २७२अ, २७३अ, २८३अ, २८४ अ, २८५ अ, २८६अ, २८७अ, २८८अ, २५४अ, २५५अ.