अन्नातील भेसळ रोखण्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त करण्यात आली असून दुधात भेसळ करणाऱ्यांना किमान वर्षभर तुरुंगात सडविण्यासाठी हा गुन्हा अजामीनपात्र करण्यात येणार आहे. त्यासाठी गृह विभागाला विनंती करण्यात आली असून सर्वोच्च न्यायालयातही पाठपुरावा सुरू असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांनी सोमवारी विधानसभेत दिली.

सोलापूर जिल्ह्य़ातील सुगाव भोसे येथील श्रीराम दूध संकलन केंद्रावर रसायनांचा साठा जप्त करण्यासंदर्भातला प्रश्न भारत भालके, अजित पवार, डॉ. पतंगराव कदम, गणपतराव देशमुख, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, आशीष शेलार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता. राज्यात सर्वत्र दुधात भेसळ केली जात असून मुंबईत तर अशा टोळ्याच कार्यरत असल्याचा आरोप सदस्यांनी केला. त्यावर बोलताना दुधात भेसळ होत असल्याचे बापट यांनीही मान्य केले.

Baramati Namo Maharojgar Melava
निमंत्रण पत्रिकेतील आणखी एक घोळ सुधारण्यासाठी प्रशासनाची धावाधाव
Surrogate Mother Case, First in nagpur, Approved, Surrogacy Act 2021, District Medical Board,
नवीन कायद्यानुसार नागपुरात पहिल्या ‘सरोगेट मदर’ प्रकरणास मंजुरी
Meeting in Mumbai under the chairmanship of Chief Minister Eknath Shinde regarding Sulkood water supply Kolhapur
पुन्हा एकदा ठरलं! सुळकुड पाणी योजनेचा कंडका पडणार; मुख्यमंत्र्यांकडे शुक्रवारी बैठक
pm Modi Yavatmal
पंतप्रधानांची यवतमाळमध्ये सभा, पोलिसांनी कशासाठी बजावली नोटीस?

राज्यात पुन्हा ऑनलाइन लॉटरी

काही वर्षांपूर्वी भ्रष्टाचाराच्या आरोपावरून बंद पडलेली ऑनलाइन लॉटरी पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सरकारने सुरू केल्या आहेत. त्यासाठी तांत्रिक, कायदेशीर आणि सामाजिक बाबी तपासण्यात येत असून याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषदेत सांगितले.

ऑनलाइन लॉटरी पुन्हा सुरू करण्याबाबत सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर राज्यात ऑनलाइन लॉटरी बंद करण्यात आली आहे. ऑनलाइन लॉटरी पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी लॉटरी विक्रेत्यांनी केली आहे. याबाबत संबंधितांशी यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.