ऐरोली येथील चिमुरडीचे अपहरण करून हत्या केल्याची घटना ताजी असताना कामोठे वसाहतीतून  शुक्रवारपासून एक दहा वर्षांची मुलगी बेपत्ता झाली आहे. नवी मुंबई पोलिसांनी मुलीच्या शोधासाठी सात पथके स्थापन केली आहेत. अपहृत मुलीचे नाव प्रियंका गुप्ता असे आहे. गुप्ता कुटुंबीय नुकतेच उत्तर प्रदेशाातून कामोठय़ात राहायला आले आहेत. विजयकुमार हे इलेक्ट्रिशियनचे काम करतात. घरात सगळे झोपले असताना प्रियंका घराबाहेर गेली, असे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत प्रियंकाची आई पूनम हिने म्हटले आहे. प्रियंकाचे वडील हे सावत्र पिता असल्याने पोलिसांचा संशय घरच्या मंडळींवर आहे.