छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आवाजातील खास ध्वनीचित्रफित प्रसारित करण्यात आली आहे. शिवाजी महाराजांच्या विविध गुणांची महती सांगणाऱ्या या ध्वनीचित्रफितीला राज यांचा आवाज लाभल्यामुळे नेटकऱ्यांकडून चांगलीच पसंती मिळत आहे. दरम्यान, आज शिवाजी पार्कवर मनसेकडून जोषात शिवजयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमानंतर राज यांनी पत्रकारपरिषदही घेतली. शिवजयंती साजरी करण्यासाठी तारीख, दिवस पाहण्याची गरज नाही. तारखेप्रमाणे तिथीलादेखील शिवजयंती साजरी झाली पाहिजे, असे त्यांनी यावेळी म्हटले.

पक्षाचे उपाध्यक्ष अभिजित पानसे यांनी चित्रफितीच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्य संस्थापक सर्वांचे लाडके श्री. छत्रपती शिवा…

Posted by MNS Adhikrut on Thursday, March 24, 2016