फेसबुक पेज लॉन्च करताना दाऊद आणि मोदी सरकार यांच्यात ‘सेटिंग’ असल्याची घणाघाती टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. आता याच विषयावर व्यंगचित्र काढत राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. या व्यंगचित्रात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम मोदींना भारतात फरफटत आणत असल्याचे दिसत आहे. मात्र मोदी दाऊदला मीच पाकिस्तानातून फरफटत आणल्याचे सगळ्यांना सांगत आहेत. शनिवारी रात्री राज ठाकरेंनी हे व्यंगचित्र फेसबुक पेजवर प्रसिद्ध करताच त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे.

राज ठाकरेंनी व्यंगचित्रात भारत आणि पाकिस्तानची सीमारेषा दाखवत त्याठिकाणी २०१९ या वर्षाचा उल्लेख केला आहे. ‘२०१९ मधील लोकसभा निवडणुकीआधी दाऊदला भारतात आणून मोदींकडून त्याचे भांडवल केले जाईल,’ असा आरोप राज ठाकरेंनी मागील आठवड्यात फेसबुक पेज लॉन्च करताना केला होता. याच आधारावर दाऊद पाकिस्तानातून भारतात येत असल्याचे व्यंगचित्र राज ठाकरेंनी काढले आहे. या व्यंगचित्रात दाऊद मोदींना फरफटत आणत असल्याचे दिसत आहे. तर मीच दाऊदला भारतात फरफटत आणल्याचे मोदी इतरांना सांगत आहेत.

PMC pune municipal corporation
रस्त्यावर फेकलेल्या कचऱ्यातून पत्ते शोधून दंडाची वसुली; मोटारीतून कचरा फेकणाऱ्यांचा पाठलाग करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई
delhi farmer protest marathi news, trolley times newspaper marathi news, trolley times newspaper delhi farmers protest marathi news
ना ऑफिस, ना प्रेस… ट्रॅक्टरमधून निघणारं जगावेगळं वृत्तपत्र…
dwarka pm modi
प्राचीन द्वारका नगरीच्या दर्शनातून पंतप्रधान मोदींचा अहिर समुदायाला संदेश
Kangana Ranaut
चित्रपटसृष्टीने आपल्याला अनेकदा अपमानित केले, कंगना राणावतचा न्यायालयात दावा

राज ठाकरेंनी शनिवारी रात्री त्यांच्या फेसबुक पेजवर दाऊद आणि मोदींचे व्यंगचित्र प्रसिद्ध केले. हे व्यंगचित्र आतापर्यंत ३३ हजार लोकांनी लाईक केले आहे. राज ठाकरेंनी या व्यंगचित्राला ‘तर्कचित्र’ असे नाव दिले आहे. या व्यंगचित्रावर आतापर्यंत एक हजाराहून अधिक प्रतिक्रिया आल्या असून राज ठाकरेंच्या या फटकाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरेंची आठवण करुन दिली, अशा प्रतिक्रिया अनेकांनी हे व्यंगचित्र पाहून दिल्या आहेत. राज ठाकरेंचे हे व्यंगचित्र २ हजाराहून अधिक लोकांनी शेअर केले आहे.

मागील आठवड्यात मुंबईतील रविंद्र नाट्यमंदिरात राज ठाकरेंनी फेसबुक पेज लॉन्च केले. त्यावेळी त्यांनी दाऊद इब्राहिमवरुन मोदी सरकारवर गंभीर आरोप केला होता. ‘दाऊदला स्वत:हून भारतात परतण्याची इच्छा आहे. कारण तो विकलांग झाला असून मातृभूमीत त्याला अखेरचा श्वास घ्यायचा आहे. त्यासाठी तो केंद्र सरकारसोबत सेटलमेंट करण्याच्या तयारीत आहे,’ असा घणाघाती आरोप राज ठाकरेंनी केला होता. ‘दाऊद स्वत:च्या इच्छेने भारतात येणार. त्याचे श्रेय मात्र मोदी घेणार आणि २०१९ च्या निवडणुकीत त्याचा फायदा भाजपला होणार,’ असे राज ठाकरेंनी म्हटले होते.