महापालिकेच्या नगरसेवकांना तसेच मुंबईकरांना विश्वासात न घेता पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी सुरू केलेल्या फेरीवाला सर्वेक्षणामुळे मुंबईतील केवळ पदपथच नव्हे तर सोसायटय़ांच्या प्रवेद्वारातील जागाही अनधिकृत फेरीवाल्यांनी अडवून ठेवल्या आहेत. सर्वेक्षणामुळे फेरीवाल्यांची मुंबईतील संख्या दुपटीहून वाढली असून मनसेने सोमवारी हे सर्वेक्षण थांविण्याच्या मागणीसाठी पालिका आयुक्त कुंटे यांना मुख्यालयातील त्यांच्या कार्यालयातच घेराव घातला. या वेळी आपण उद्यापर्यंत परिस्थितीचा आढावा घेऊन सर्वेक्षण थांबविण्याबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासन मनसेच्या शिष्टमंडळाला आयुक्तांनी दिले.सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आणि राष्ट्रीय धोरणाचा आधार घेत पालिका आयुक्त कुंटे यांनी मुंबईतील फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणाचा कार्यक्रम हाती घेतला. सर्वेक्षण होणार असे समजताच मुंबईच्या प्रत्येक भागात अचानक फेरीवाले वाढू लागले आहेत़