सर्व रेल्वे स्थानकांवरील तिकीट खिडक्यांसमोरील लांबच लांब रांगांपासून प्रवाशांची सुटका करण्यासाठी आता पश्चिम रेल्वेवर पेपरलेस तिकीट काढण्याचा नवीन पर्याय उपलब्ध होणार आहे. मोबाइल तिकीट प्रणालीला पूरक असलेल्या या उपक्रमाचे उद्घाटन ८ जुल रोजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते होणार आहे.
या पर्यायामुळे मोबाइल तिकीट काढल्यानंतर त्या तिकिटाची िपट्र घेण्याची गरज राहणार नाही. तसेच या सेवेचा गरफायदा घेतला जाऊ नये यासाठी रेल्वे स्थानकात शिरण्यापूर्वी १५ मीटर ते २५ किलोमीटर अंतरावरूनच हे तिकीट काढता येणार असल्याची योजना रेल्वेने तयार केली आहे.
उपनगरीय प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने मोबाइल तिकीट प्रणाली सुरू केली. मात्र अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर तिकिटाचे िपट्र मिळवण्यासाठी प्रवाशांना लांबच लांब रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे प्रवाशांनी या प्रणालीकडे पाठ फिरवली. त्यामुळे या प्रणालीला संजीवनी देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने चेन्नईपाठोपाठ आता पश्चिम रेल्वेवर येत्या ८ जुलपासून पेपरलेस तिकीट उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असल्याचे पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शैलेंद्र कुमार यांनी सांगितले. हा पर्याय सर्व स्मार्टफोनमध्ये उपलब्ध होणार आहे.
यााशिवाय मोबाइलवरील तिकीट तपासण्यासाठी हॅण्ड हेल्ड मशीन तिकीट तपासनीसांना देण्यात येणार आहे. ही सेवा सर्व स्मार्टफोनमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. मात्र मोबाइलची बॅटरी संपल्यास तिकीट कसे तपासणार, असा प्रश्न रेल्वे अधिकाऱ्यांना विचारला असता, त्या प्रवाशाचा प्रवास ‘विनातिकीट’ धरला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पश्चिम रेल्वेवर दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ७५ लाखांहून अधिक आहे. यात दर दिवशी तिकीट खिडक्यांवरून तिकीट काढणाऱ्यांची संख्या ६० टक्के, एटीव्हीएमवरून २३ टक्के आणि जेटीबीएसवरून १७ टक्के आहे. या पर्यायामुळे तिकीट खिडक्यांवरील रांगा कमी होतील.
सध्या एक लाख प्रवाशांच्या मागे केवळ २५० ते ३०० प्रवासी या सुविधेचा वापर करत आहेत. मात्र पेपरलेस हा पर्याय आल्यास प्रवासी या सेवेला भरघोस प्रतिसाद देतील, असा विश्वासही या अधिकाऱ्याने व्यक्त केला.

फायदे
*रांगेच्या कटकटीतून सुटका
*१०० रुपयांपासून ५ हजारांपर्यंत रिचार्ज उपलब्ध
*वेळेची बचत होणार
*इंटरनेटद्वारेही रिचार्ज करण्याचा पर्याय