मुंबई तलावक्षेत्रात गेले दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे तुळशी तलावानंतर आता मोडकसागर तलावही भरून वाहू लागला आहे. बुधवारी पहाटे ४ वाजता मोडकसागर तलाव भरून वाहू लागला. या तलावाची क्षमता १ लाख २९ हजार दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची आहे. तलावाची उंची १६३.१५मीटर आहे. २४ तासांत तब्बल २१६ मिमी पाऊस पडल्याने मोडकसागर तलावातील पाणीसाठय़ात मंगळवारी १७ हजार ७५३ दशलक्ष लिटर पाणीसाठय़ाची वाढ झाली होती.
मोडकसागरही भरल्याने आता मुंबईकरांवरील पाणीकपातीचे संकटही टळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.