चालकानंतर प्रवाशांच्या सुरक्षतेची ‘दोर’ हाती असणाऱ्या वाहकांचीही आता आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. विविध वैद्यकीय कारणांसाठी वारंवार अनुपस्थित राहणाऱ्या आणि ३५ वर्षे पूर्ण झालेल्या वाहकांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. यात प्राथमिक वैद्यकीय तपासणीसह रक्त चाचणी, यकृत कार्य चाचणी, मूत्रपिंड चाचणी, आणि क्षयरोग अशी र्सवकष तपासणी केली जाणार आहे. यामुळे ऐन वेळी गैरहजर राहणाऱ्या वाहकांचे प्रमाण कमी होण्याचा दावा एसटीच्या अधिकाऱ्यांकडून केला जात आहे.
राज्याच्या कानाकोपऱ्यात अगदी दुर्गम भागांतील रस्त्यांवरून एसटीच्या बसगाडय़ा धावत असतात. यात रस्त्यांची स्थिती बिकट असल्याने आणि धाववेळ पाळण्याचाही ताण असल्याने अनेकदा चालकांसह वाहकांच्या आरोग्याच्या समस्या भेडसावत असतात. या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी एसटीने आता वाहकांचीही आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमात ३५ वर्षीय पुढील वाहकांची प्राधान्याने वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. यात आगारनिहाय वाहकांच्या वयाप्रमाणे यादी तयार करणार आहे. त्यानुसार वैद्यकीय चाचणीकरिता पाठविण्यासाठी वाहकांचे गट तयार करण्यात येतील.

चालकाप्रमाणे प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होण्याच्या दृष्टीने वाहकांवरही महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे दोन वर्षांतून एकदा वाहकांची आरोग्य तपासणी केली जावी, असा प्रस्ताव संचालक मंडळापुढे आला होता, त्यास मान्यता देण्यात आली आहे. या उपक्रमामुळे वैद्यकीय तपासणीकरिता वारंवार गैरहजर राहणाऱ्या वाहकांना दिलासा मिळेल आणि एसटीचे कामकाज अधिक सुरळीत होण्यास मदत होईल.
रणजित सिंह देओल, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

mumbai metro marathi news, mumbai metro latest marathi news
मेट्रो १ आता लवकरच एमएमआरडीएच्या मालकीची, एमएमओपीएल विरोधातील दिवाळखोरीची याचिका निकाली
Planning of extra bus service by state transport due to holidays
नाशिक : सुट्यांमुळे राज्य परिवहनतर्फे जादा बससेवेचे नियोजन
tariff hike electricity
राज्यांतील वीज ग्राहकांवर १५ ते ४० टक्के दरवाढ लागू; वीज तज्ञ प्रताप होगाडे यांची माहिती
Pune, Youth Cheated, Rs 57 Lakh, Stock Market Investment Scam, NDA Employee, cyber fraud, Victims, lure, police, marathi news,
पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने ‘एनडीए’तील कर्मचाऱ्याची ५७ लाखांची फसवणूक