एसटीच्या ताफ्यात २००० पैकी अवघ्या १३ वातानुकूलित बस

एसटी महामंडळांने लाखो प्रवाशांना दाखवलेल्या वातानुकूलित संपूर्ण  ‘शिवशाही’ बसचे स्वप्न तूर्त या वर्षांतही पूर्ण होणार नाही. शिवशाही बस दाखल करण्याची जानेवारी २०१६ मध्ये घोषणा होऊनही आतापर्यंत २००० पैकी १३ बसच एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत आणि चार मार्गावर त्यांची सेवा सुरु आहे. स्वत:च्या मालकीच्या आणि भाडेतत्वावरील अशा ५७ बस पुढील महिन्यात दाखल होतील.

The High Court reprimanded the government to be sensitive to the demand for the house of the eyewitnesses of the 26 11 attacks Mumbai news
२६/११ हल्ल्यातील प्रत्यक्षदर्शीच्या घराच्या मागणीबाबत संवेदनशीलता दाखवा; उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले
loksatta readers reactions loksatta readers opinions loksatta readers response
लोकमानस: जनतेला दरवेळी मूर्ख बनवता येत नाही
love triangle nagpur
‘पती, पत्नी और वो…’ प्रेमाच्या त्रिकोणातून दोन संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर; भरोसा सेलने…
youth lured a young woman
नागपूर : प्रेमसंबंध एकीशी अन् लग्न दुसरीशी… हळद लागण्यापूर्वीच नवरदेवाच्या हातात बेड्या…

वायफाय, सीसीटीव्ही व स्लीपर कोचच्या सुविधा असलेल्या शिवशाही बसचे पहिले दर्शन जानेवारी २०१६ मध्ये परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष दिवाकर रावते यांनी घडवले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सोहळ्यात शिवशाही बसची घोषणा करण्यात आली. त्यावेळी ५०० बसेस लवकरच ताफ्यात सामील होतील, असे जाहीर करण्यात आले. भाडेतत्वावर या बसेस महामंडळांला पुरवण्यात येणार होत्या. त्यात चालक कंपनीचा तर कंडक्टर हा महामंडळांचा असणार होता. मात्र, वर्षभरात शिवशाही बसेस प्रत्यक्ष ताफ्यात सामील होण्याची तारीख कधीच जुळून आली.

थेट जून २०१७ रोजी पुन्हा शिवशाही बसला परिवहन मंत्र्यांकडून हिरवा झेंडा दाखवण्यात आला आणि शिवशाही बस दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली. भाडेतत्वावरील ५०० बसची संख्याही वाढवण्यात आली. ५०० वरून थेट ही संख्या १५०० पर्यंत नेण्यात आली. तर ५०० वातानुकूलित शिवशाही बस या स्वत:च्या मालकीच्या घेण्यात येणार होत्या. अशा तऱ्हेने दोन हजार वातानुकूलित शिवशाही बस दाखल करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. भाडेतत्वावरील १,५०० पैकी ५०० बस तर १५ ऑगस्टपर्यंत एसटीच्या ताफ्यात दाखल होणार होत्या. परंतु ही मुदतही उलटून गेली. आतापर्यंत एसटीच्या ताफ्यात १३ शिवशाही बसच दाखल असून यामध्ये एक बस  एसटीच्या मालकीची आहे. तर ऊर्वरीत बस या भाडेतत्त्वावरील आहेत. १३ बस या पुणे-लातूर, पुणे-सोलापूर, पुणे-कोल्हापूर, मुंबई-रत्नागिरी मार्गावर धावतात.

  • एसटी महामंडळांकडून स्वत:च्या मालकीच्या आणखी ५० शिवशाही बस, तर भाडेतत्त्वावरील ७ बस ऑक्टोबर २०१७ सालापर्यंत दाखल करण्यात येतील.
  • यातील नागपूर ते भंडारा मार्गावर सध्या १२ निमआराम बस आणि नाशिक ते पुणे मार्गावर ३४ निमआराम बस धावत असून त्या सर्व बस बंद करुन त्याऐवजी शिवशाही बस चालवल्या जातील.
  • निमआराम बस बंद करतानाच त्या बस लाल डबा असलेल्या परिवर्तनमध्ये रुपांतरीत केल्या जात आहेत.

यासंदर्भात एसटी महांडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजिंत सिंह देओल आणि एसटीचे जनसंपर्क अधिकारी तांबोळी यांच्या मोबाईलवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

सध्या धावत असलेल्या शिवशाही बस

  • पुणे ते लातूर ते पुणे- २ बस
  • पुणे ते सोलापूर- १ बस
  • पुणे ते कोल्हापूर ते पुणे-८ बस
  • मुंबई ते रत्नागिरी ते मुंबई- २ बस