लोकसत्ता गप्पाकार्यक्रमात श्रेष्ठ गायक पंडित मुकुल शिवपुत्र यांनी मर्म उलगडले

संगीताचे व्याकरण ठरलेले आहेच, त्याच्या प्रवासातील मार्गही ठरलेले आहेत. महत्त्वाचा आहे तो तुमचा त्या मार्गावरील प्रवास, तुमची मार्गक्रमणा, या शब्दांत ज्येष्ठ व श्रेष्ठ गायक पंडित मुकुल शिवपुत्र यांनी संगीताचे मर्म उलगडले. निमित्त होते ते लोकसत्ता आयोजित ‘लोकसत्ता गप्पा’ या उपक्रमांतर्गत रंगलेल्या मुकुलजींच्या सूरमयी संवादाचे.

Kharge on narendra modi
“मोदींनी तरुणांना पूर्णपणे उद्ध्वस्त केले”, मल्लिकार्जुन खरगेंचे पंतप्रधानांवर गंभीर आरोप; काय म्हणाले?
mallikarun kharge on bjp
“अनेक मंदिरांमध्ये आजही दलितांना प्रवेशबंदी”; भाजपावर आरोप करताना मल्लिकार्जुन खरगेंनी सांगितला अनुभव
अनोखी इफ्तार मेजवानी; हिंदू महिलांकडून मुस्लिम महिलांसाठी गोड भेट
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी

शास्त्रीय रागदारी गायकी, ठुमरी, ध्रुपद , ख्यालगायकी अशा सगळ्याच संगीतप्रकारांवर विलक्षण हुकमत असलेले पंडित मुकुल शिवपुत्र यांच्याशी मनमुक्त गप्पांचा कार्यक्रम शनिवारी महालक्ष्मी येथील जी ५ए सभागृहात आयोजित करण्यात आला होता. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर व ‘लोकसत्ता’चे साहाय्यक संपादक मुकुंद संगोराम यांनी पंडितजींशी संवाद साधला. संगीत, साहित्य यांसह सांस्कृतिक क्षेत्रातील मातब्बर मंडळी या कार्यक्रमास उपस्थित होती. केसरी, जनकल्याण सहकारी बँक लिमिटेड हे या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते. पॉवर्ड बाय एलआयसी असलेल्या या कार्यक्रमाचे टेलिव्हिजन पार्टनर झी २४ तास हे होते.

पंडित मुकुलजींच्या षष्टय़ब्दिपूर्तीचा योग साधलेली गप्पांची ही मैफल रंगली ती मुकुलजींचे वडील कुमार गंधर्व यांच्या आठवणी, संगीताची भाषा, शास्त्रीय गायकीचे स्वरूप, प्रहर व रागांची सांधणी, संगीताची आजची फ्युजन रीत आदी अनेक विषयांनी. वडील पंडित कुमार गंधर्व यांच्या शिकवणीतून, त्यांचे गाणे ऐकताना लहानपणापासूनच संगीत आकळत गेले. कुमारजी म्हणजे अखंड संगीतात, गाण्यात बुडालेला माणूस. संगीताविषयीची त्यांची असोशी केवळ अद्भुत म्हणावी अशीच होती, अशा आठवणी मुकुलजीनी जागवल्या.

संगीतशास्त्र, त्याचे आकलन, त्याचा प्रवास अशा काहीशा क्लिष्ट विषयांची सुगम मांडणी यावेळी मुकुलजींनी केली. संगीत ही मुळात आनंद घेत शिकण्याची गोष्ट आहे. त्यातील शब्द व स्वररचना एकमेकांना बिलगून जेवढय़ा येतील तेवढे संगीत सुंदर, श्रवणीय होत जाते, असे ते म्हणाले. शास्त्रीय संगीताचे.. खरे म्हणजे एकूणच संगीताचे स्वत:चे असे काही ठाशीव नियम आहेत. ते मार्ग सगळ्याच संगीतोपासकांसाठी उपलब्ध असतात. याच वाटेवर पूर्वसुरी कसे चालले याच्या खाणाखुणा समोर असतात. महत्त्वाचे असते ते या सगळ्याला साक्षी ठेवून, त्यांच्यापासून काही शिकत तुम्ही तुमचा मार्ग कसा निवडता, त्यावर कशी मार्गक्रमणा करता ते.. अशी मांडणी मुकुलजींनी केली.

सुमारे दोन तास चाललेल्या गप्पांच्या या भरजरी मैफलीचा समारोप मुकुलजींनी ‘गुरा तो जिने’ या भजनाने केला.