पश्चिम रेल्वेवर स्वयंचलित दरवाजांची लोकल

गर्दीच्या वेळी प्रवासी गाडीच्या दरवाजातून खाली पडून होणाऱ्या अपघातांची संख्या शून्यावर आणण्यासाठी काही वर्षांपूर्वी पश्चिम रेल्वेने केलेला आणि अत्यंत सुमार तंत्रज्ञानामुळे फसलेला स्वयंचलित दरवाजांचा प्रयोग पश्चिम रेल्वेवरच पुन्हा एकदा नव्याने रंगणार आहे. या वेळी पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या बंबाíडअर गाडय़ांची निवड त्यासाठी करण्यात आली असून एका गाडीच्या तीन डब्यांमधील एकूण २२ दरवाजे स्वयंचलित होणार आहेत. यासाठी ९० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून निविदा प्रक्रियेला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.

Dombivli, poultry farm, Kopar railway station
डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात कोंबड्यांचा खुराडा, रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
Block. Konkan Railway, trains,
कोकण रेल्वेवर ब्लॉक; रेल्वेगाड्यांचा खोळंबा
old man hit by bike rider, Kamothe,
कामोठेत वृद्धाला दुचाकीस्वाराने उडवले
Dried pods of opium, Dhule, opium Dhule,
धुळे : लसूण भरलेल्या मालमोटारीत हे काय… पोलीसही चकित

पश्चिम रेल्वेवर तत्कालीन महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद यांनी स्वयंचलित दरवाजांच्या प्रयोगावर भर दिला होता. त्यासाठी महालक्ष्मी येथील कारखान्यात एका रेट्रोफिटेड पद्धतीच्या गाडीच्या महिलांच्या प्रथम श्रेणीच्या एका डब्यातील दोन दरवाजे स्वयंचलित करण्यात आले होते. मार्च २०१५मध्ये हा प्रयोग सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच तो फसल्याचे पश्चिम रेल्वेच्या लक्षात आले होते. दरवाजे बंद झाल्यानंतर डब्यात वायुविजनाची उत्तम सोय नसल्याने महिला प्रवाशांनी घुसमट जाणवत असल्याचे सांगितले होते. तसेच अनेकदा दरवाजे उघडत नसल्याचेही आढळले होते.

या सर्व तांत्रिक दोषांवर तोडगा काढत पश्चिम रेल्वेने स्वयंचलित दरवाजांचा हा प्रयोग पुन्हा नव्याने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पश्चिम रेल्वेने काढलेल्या निविदेला सर्वप्रथम चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यानंतर फेरनिविदेला मात्र उत्तम प्रतिसाद मिळाला असून आता हे स्वयंचलित दरवाजे बसवण्याचे काम सुरू झाले आहे.

या निविदेअंतर्गत एका बंबार्डिअर गाडीच्या तीन डब्यांमधील २२ दरवाजे स्वयंचलित करण्यात येणार आहेत. बंबार्डिअर गाडय़ांमध्ये असलेली वायुविजनाची उत्तम सोय यासाठी फायदेशीर ठरेल, असेही मत पश्चिम रेल्वेचे अधिकारी व्यक्त करत आहेत.

  • जुन्या प्रयोगानुसार या नव्या प्रयोगातही या स्वयंचलित दरवाजांचे नियंत्रण गार्डकडे असणार आहे.
  • पुढील सहा महिन्यांमध्ये यातील पहिला डबा प्रवाशांच्या सेवेत येणार असल्याचेही पश्चिम रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.