बँकेचे कर्ज थकवल्याने माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी अडचणीत सापडला आहे. विनोदने डोंबिवली नागरी सहकारी बँकेचे (डीएनएसबी) कर्ज थकवले असून बँकेने त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली आहे. त्याची मालमत्ताही जप्त करण्यात येणार आहे.
अनेक वर्षे झाल्याने आणि वारंवार कर्ज भरण्याची विनंती करूनही विनोद कांबळीने परतफेड न केल्याने अखेर बॅंकेने आज यासंबंधित जाहिरात दिली आहे. जाहिरातीत विनोद कांबळी व त्याची पत्नी अँड्रिया हिचा कर्जदार म्हणून फोटो छापण्यात आला आहे. तसेच वांद्रे रिक्लेमेशन येथील घराचा संपूर्ण पत्ताही देण्यात आला आहे. ‘विनोद गणपत कांबळी (कर्जदार) व अँड्रिया विनोद कांबळी (सहकर्जदार) यांना वितरित करण्यात आलेले कर्जाची वेळोवेळी मागणी करूनही परतफेड करण्यात आलेली नाही. बँकेने त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. तरी वरील व्यक्तीच्या मालमत्तेसंदर्भात कोणालाही माहिती असल्यास बँक व्यवस्थापनास कळवावे’, असे या जाहिरातीत म्हटले आहे.