मुंबईतील गिरगावमध्ये शनिवारी एका इमारतीचा काही भाग कोसळल्याची दुर्घटना घडली. येथील भटवाडी परिसरात असलेल्या पाठारे हाऊस या इमारतीचा काही भाग आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कोसळला.  या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील स्लॅब आणि भिंत कोसळल्यामुळे ही दुर्घटना घडली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या चार गाड्या आणि तीन रूग्णवाहिका तातडीने घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. काहीवेळापूर्वीच इमारतीच्या ढिगाऱ्याखाली तीनजणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. मात्र, सुरूवातीला  हा परिसर चिंचोळा आणि दाटीवाटीचा असल्यामुळे अग्निशमन दलाला मदतकार्यात अडथळे येत होते. मुंबईत काल रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर आजही कायम आहे. त्यामुळे ही दुर्घटना घडली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. भटवाडी हा गिरगावमधील जुन्या लोकवस्तीचा भाग म्हणून ओळखला जातो.  या भागातील अनेक इमारती जुन्या झाल्यामुळे धोकादायक अवस्थेत आहेत.
मुंबईची पाऊस कोंडी!
मुसळधार पावसामुळे शुक्रवारी सकाळपासून मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले असून मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वे या तिन्ही मार्गावरील वाहतूक खोळंबली आहे. तिन्ही मार्गावरील लोकल १०-१५ मिनिटे उशिराने धावत आहेत. मुंबई शहर आणि उपनगरात शुक्रवार सकाळपासून जोरदार पाऊस पडत असून, रस्ते वाहतूक आणि लोकल सेवा खोळंबली आहे. दादर, लोअर परळ, वरळी भागात जोरदार पाऊस पडत असून ठिकठिकाणी वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे चाकरमान्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
क्राँक्रिटीकरणाचा बळी!