मुंबई- अहमदाबाद महामार्गावर लक्झरी आणि मिनी बसमध्ये झालेल्या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला असून, २०जण जखमी झाले आहेत. आज पहाटे ही घटना घडली. जखमींवर मुंबई, गुजरात वर तलासरी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मुंबई अहमदाबाद महामार्गावर गुजरातमधील नडीयाद येथील प्रवाशांना घेऊन एक खासगी लक्झरी बस मुंबईकडे येत होती. पहाटे चारच्या सुमारास महाराष्ट्र – गुजरात सीमेवरील अच्छाड गावाजवळ विरुद्ध दिशेने येणा-या मिनी बसने धडक दिली. ही टक्कर ऐवढी भीषण होती की अपघातात ११ प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृतांमध्ये पाच वर्षीय लहान मुलीचाही समावेश आहे. मिनी बस डिव्हायडर तोडून दुस-या बाजूला गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.