तीन कोटी रुपयांची लाच मागणाऱ्या आयकर विभागाच्या उपायुक्ताला सीबीआयने शुक्रवारी अटक केली. याप्रकरणात आणखी दोन जणांना सीबीआयने अटक केली असून जयपाल स्वामी असे या उपायुक्ताचे नाव आहे.

मुंबईतील चर्चगेट परिसरात आयकर विभागाच्या कार्यालयात सीबीआयने कारवाई केली. आयकर विभागात उपायुक्त पदावर कार्यरत असलेल्या जयपाल स्वामी यांनी ३ कोटींची लाच मागितली होती. याप्रकरणी सीबीआयकडे तक्रार करण्यात आली होती. शुक्रवारी सीबीआयने लाचखोर उपायुक्ताला अटक केली आहे. आयकर विभागाचे उपायुक्त स्वामी यांनी कोणाकडे लाच मागितली होती आणि नेमक्या कोणत्या कामासाठी त्यांनी लाच मागितली हे समजू शकलेले नाही.