मुंबई मेट्रोच्या तिकीट दरात वाढ करण्यात आली आहे. मेट्रोच्या प्रवासी भाड्यात पाच रुपयांची तर मासिक पासात देखील ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई-मेट्रोचा एसीयुक्त प्रवास मुंबईकरांसाठी चांगलाच महाग होणार आहे. ही भाडेवाढ येत्या १ डिसेंबरपासून लागू होणार आहे.
सध्या वर्सोवा ते घाटकोपर या दरम्यानच्या तिकिटाचे दर १०,२०,३० आणि ४० रुपये इतके आहेत. त्यात वाढ होऊन आता हे दर १०,२०,२५,३५ आणि ४५ असे होणार आहेत. तर, मेट्रोचा मासिक पास दोन टप्प्यात मिळतो. त्यातील पहिल्या टप्प्यातील प्रवासासाठी ६७५ रुपयांऐवजी आता ९०० रुपये मोजावे लागणार आहेत. तर, दुसऱया टप्प्यातील प्रवासासाठी ७२५ रुपयांऐवजी ९५० रुपये प्रवाशांना मोजावे लागतील.