उपनगरीय रेल्वे मार्गावरील रूळ, स्लीपर्स, ओव्हरहेड वायर, सिग्नलिंग यंत्रणा आदींच्या देखभाल-दुरुस्तीच्या महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी कामांसाठी आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान उपनगरीय रेल्वे वाहतूक २० ते २५ मिनिटे उशिराने सुरू असेल. तसेच काही सेवा रद्द असल्याने नेहमीपेक्षा जास्त गर्दी असण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे लोकांनी जीव धोक्यात टाकून प्रवास करू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

मध्य रेल्वे

कुठे – कल्याण ते ठाणे यांदरम्यान अप धिम्या मार्गावर.

कधी – सकाळी ११.१५ ते सायं. ४.१५ वा.

परिणाम – ब्लॉकदरम्यान कल्याणहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अप धिम्या आणि अर्धजलद गाडय़ा कल्याण ते ठाणे यांदरम्यान अप जलद मार्गावर थांबतील. या गाडय़ा ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा आणि कळवा या स्थानकांवर थांबणार नाहीत. तसेच ब्लॉकदरम्यान सर्व अप व डाऊन जलद गाडय़ा त्यांच्या नेहमीच्या थांब्यांशिवाय मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या स्थानकांवरही थांबतील.

 

हार्बर मार्ग

कुठे – सीएसटी ते चुनाभट्टी/ माहीम अप आणि डाऊन मार्गावर.

कधी – सकाळी ११.१० ते सायं. ४.४० वा.

परिणाम – ब्लॉकदरम्यान सीएसटी ते वाशी, पनवेल, अंधेरी, वांद्रे यांदरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद राहील. मात्र प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल आणि कुर्ला या स्थानकांमधून विशेष सेवा चालवण्यात येतील. या ब्लॉकच्या कालावधीत प्रवाशांना अधिकृत तिकिटानिशी मुख्य तसेच पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची मुभा आहे.